dcm ajit pawar inspected drought affected area of Baramati Inform concerned authorities about situation sakal
पुणे

Ajit Pawar : 'पाणी प्रथम माणसांना, जनावरांना मग शेती..' बारामतीच्या टंचाईग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

पाण्याविषयी प्रथम माणसांना, जनावरांना मग शेतीचा विचार करू पाण्याचे संकट मोठे आहे, काटकसर करा.

जयराम सुपेकर

सुपे : खरीप हंगामात पावसाने हुलकावनी दिल्याने हिरवा चारा, माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा डेपो, जनावरांसाठी छावणी सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, उपसा जल सिंचन योजनांद्वारे पिण्याचे पाणी सोडण्यासाठी कसा मार्ग काढता येईल, असा प्रयत्न असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपे (ता.बारामती) येथे बोलताना दिली.

बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील टंचाईग्रस्त भागाचा पाहणी दौरा शुक्रवारी (ता.८) श्री.पवार यांनी केला. या वेळी तालुक्यातील जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, देऊळगावरसाळ, काऱ्हाटी, तरडोली, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, सुपे आदी गावे व वाड्या-वस्त्यांना भेटी दिल्या. सुप्यात रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांचे आगमन झाले.

त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. या दौऱ्यात त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जलसंपदाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधिक्षक अभियंता सुनंदा जगताप, वीज महावितरण कंपनीचे बारामतीचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे,

दिगंबर डुबल, महेश कानिटकर, श्रीकृष्ण गुंजाळ, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर आदींसह विविध संस्थांचे आजी-माजी ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आजच्या दौऱ्यात काही जुने, ज्येष्ठ कार्यकर्ते भेटले. त्यांच्याकडूनही टंचाईबाबत माहिती घेतेल्याचे सांगून श्री.पवार म्हणाले - खरीप हंगामातील पीके पावसाअभावी करपून गेली. काही शेतकऱ्यांनी पीके मोडून काढली. आता रब्बीचा विचार करू लागले आहेत. मात्र, अद्यापही पाऊस नसल्याने अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे.

अशा स्थितीत जनाई, शिरसाई, पुरंदर उपसा जल सिंचन योजना, निरा डावा कालवा, खडकवासला कालवा यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. बारामती, दौंड व पुरंदरमधील गावांना पाणी द्यावे लागणार आहे. काही भागात टँकर सुरू करण्याची मागणी आहे. सुपे येथील गावठान तलावात योजनेद्वारे पाणी सोडले तर टँकर भरता येतील. त्यामुळे लगतच्या टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल.

श्री.पवार म्हणाले - कऱ्हानदी कोरडी ठणठनीत आहे. थोडे पाणी असलेली काही ठिकाणची पीके वगळता ऊसाची दयनीय अवस्था झाली आहे. पाण्याविषयी प्रथम माणसांना, जनावरांना मग शेतीचा विचार करू पाण्याचे संकट मोठे आहे, काटकसर करा.

अडचणीच्या काळात राज्य सरकारकडून जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या वेळी दुध दर, रस्ते, घरकुल, बंद पाईपातून पाणी मागणी, विकास निधी आदी प्रश्नांविषयी त्यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. तालुक्यातील स्थगित झालेली कामे सुरू झाली असून, ६५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले.

तुमचा कागद ना कागद वाचतो

पवार यांनी एका तरूणाचे ऑपरेशन विषयीचे निवेदन वाचून स्वीय सहायक सुनिल मुसळे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी दिले. श्री.मुसळे यांनी संबंधितास मोबाईल क्रमांक विचारला. त्यावर पवार म्हणाले उजव्या कोपऱ्यात वर वाचा.

काहींनी दोनदा निवेदने दिली होती. त्याचीही आठवण करून दिली. अनेकांना वाटते की अजित पवार दिलेली निवेदने वाचत नाही. मित्रांनो मी प्रत्येक निवेदन वाचून त्यावर कार्यवाही करतो. म्हणजे मी तुमचा कागद ना कागद वाचतो. यावर उपस्थितांमध्ये हास्य फुलले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT