dcm ajit pawar statement about maharashtra lockdown 
पुणे

राज्याचा निर्णय आज संध्याकाळी कळेल; अजित पवारांची माहिती

मिलिंद संगई

बारामती : कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने जे निर्बंध घातलेले आहेत, त्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना सूचना दिल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे आज अजित पवार यांनी कोरोना संदर्भात वरिष्ठ अधिका-यांशी सल्लामसलत केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीसह सर्व पक्षीय नेत्यांची एकत्र बैठक बोलावली असून, त्यात पुढील निर्णय होईल व तो आज संध्याकाळी किंवा उद्या सर्वांना समजेल, असेही त्यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले, 'रेमडीसेव्हर इंजेक्शन राज्य शासनाच्या रुग्णालयात कमी पडत नाहीत पण खासगी दवाखान्यात त्याची कमतरता भासत आहे, त्या बाबत काही वेगळी कारण पुढ आलेली आहेत, त्या बद्दलही आजच्या बैठकीत चर्चा झाली, पुण्यात आज होणा-या बैठकीत या बाबत जिल्हा स्तरावर सर्वांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ. आज झालेल्या बैठकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना बोलावलेले होते, त्यात रुग्णालय व्यवस्थापनापासून ते रेमडीसेव्हर इंजेक्शन, लसीकरण, बेड उपलब्धता, रुग्णवाहिका या सारख्या अनेक बाबींवर चर्चा झाली.'

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान रेमडीसेव्हर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत एक समिती नियुक्त करण्याबाबत आज चर्चा झाल्याची माहिती जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. अनेक ठिकाणी सहा ऐवजी आठ इंजेक्शनचे प्रिस्क्रीप्शन आले, त्या मुळे गोंधळ होतो आहे. पुढील दोन दिवसांत राज्य व जिल्हा स्तरावर रेमडीसेव्हरचा तुटवडा भासू नये या साठी नियोजन होईल, असेही ते म्हणाले. रेमडीसेव्हरचा काळाबाजार झाल्याची तक्रार अद्याप तरी आलेली नाही, शासनस्तरावर या इंजेक्शनचा तुटवडा नाही, असेही त्यांनी सांगितले. कालच पुणे जिल्ह्यासाठी 50 हजार लसीचे डोस प्राप्त झाले असल्याने आता लसीकरणही सुरु होईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT