dcm ajit pawar visit baramati maratha kranti morcha oppose maratha reservation sugarcane crushing Sakal
पुणे

Baramati News : बारामतीत अजित पवारांच्या हस्ते गाळपास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध; आंदोलनाचा इशारा...

मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने आमदार खासदारांनाही गावबंदीचा निर्णय झाला

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने आमदार खासदारांनाही गावबंदीचा निर्णय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आगामी बारामती दौ-यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार शनिवारी (ता. 28) कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय व्यक्तींना गावबंदी करण्यात आली आहे. तशी प्रसिध्दी राज्यभर करण्यात आली आहे, असे असतानाही आपण गळीत हंगाम अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केल्याची माहिती मिळाली आहे.

यंदाचा गळीत हंगाम कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या हस्ते करु नये, ही आमची आपल्याला विनंती आहे. राजकीय व्यक्तींच्या हस्ते गळीत हंगाम केल्यास मराठा समाज बहुसंख्येने कारखान्यावर जमून तीव्र आंदोलन करेल, त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर असेल.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची तीव्रता वाढू लागल्याने आता राजकीय व्यक्तींची गावबंदी करण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला असून आता अजित पवार यांच्या बारामती दौ-यादरम्यान नेमके काय घडणार या कडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT