Admission Sakal
पुणे

जात पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत

बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना राखीव प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट) सादर करणे अनिवार्य आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बारावीनंतर (HSC) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना (Syllabus) राखीव प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना (Student) प्रवेशाच्या (Admission) वेळी जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट) (Caste Validity Certificate) सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे यंदा विज्ञान (सायन्स) शाखेतून बारावी पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करण्यासाठी पुणे जिल्हा जात पडताळणी समितीने येत्या ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. (Deadline for Submission of Caste Verification Proposal is June 30)

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, बीएस्सी (ॲग्री), पशुवैद्यकीय शास्त्र, दंतशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र आदींसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत जात पडताळणीबाबतचे प्रस्ताव सादर करणे आवश्‍यक असल्याचे पुणे जिल्हा जातपडताळणी समितीचे सदस्य व उपायुक्त नितीन ढगे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपापल्या महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांना हे प्रस्ताव सादर करण्यास सूचित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

असा करा अर्ज!

पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) www.bartivalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. या अर्जाची प्रिंट काढावी. ही प्रिंट आणि कागदपत्रे असा एकत्रित प्रस्ताव जात पडताळणी समितीकडे सादर करावा, त्याची पोहोच घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT