pune university 
पुणे

बहिःस्थ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी पर्याय निवडीसाठी सोमवार पर्यंत मुदत

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे, ता. 19 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाची आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्‍टोबर महिन्यात घेतली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांना ऑनलाइन परीक्षा द्यायची आहे की ऑफलाइन याचा पर्याय निवडण्यासाठी 21 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठातर्फे नियमित प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. सर्व विद्याशाखेतील सुमारे 2 लाख 48 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यातील 85 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचा पर्याय निवडला आहे.

विद्यापीठाने नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेबरोबरच विद्यापीठाच्या बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील बॅकलॉग आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचाही निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी एकूण 16 हजार विद्यार्थी असणार आहेत. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न ( मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध आहे, त्यातील एक पर्याय विद्यार्थ्यांनी निवडावा.

बहि:स्थ अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लिंकवरून अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही, असे आवाहन विद्यापीठाच्या मुक्‍त अध्ययन प्रशालेचे संचालक प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.अर्ज करताना काही अडचणी आल्यास 020-25622458/59 या क्रमांकावर संपर्क साधावा. पर्याय निवडीसाठी http://sps.unipune.ac.in/app/ या लिंकवर भेट द्यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: मिरजेतील पहिल्या गणपतीचे विसर्जन; नदीवेस शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीसाठी गणेश तलावावर जय्यत तयारी

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT