deadline to apply MPSC exam July 15 Due to server down maha e seva kendra  sakal
पुणे

महा ई सेवा केंद्रांचे काम ठप्प; सरकारी अनास्थेमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

चार वर्ष अभ्यास केलाय अर्ज भरता नाही आला तर मी काय करू?" असा सवाल अनिल सप्रे या विद्यार्थ्याने केला

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर : "एमपीएससी परीक्षेचा अर्ज दाखल करण्याची मुदत १५ जुलैपर्यंतच आहे. सर्वर डाऊनमुळे महाईसेवा केंद्रांचे काम ठप्प असल्याने मला उत्पन्नाचा दाखल अजून मिळाला नाही. तिथून पुढे विशेष आर्थिक मागास घटकाचा दाखला आठ-दहा दिवसांनी मिळतो. चार वर्ष अभ्यास केलाय अर्ज भरता नाही आला तर मी काय करू?" असा सवाल अनिल सप्रे या विद्यार्थ्याने केला आहे.राज्यसरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या 'महाआयटी' पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील सातशे महा-ई-सेवा केंद्रांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस विद्यार्थी, पालक, शेतकरी यांचे हाल चालले आहेत.दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल प्राप्त झाले असून राज्यभरात प्रवेशाची धावपळ उडाली आहे.

यासाठी महाईसेवा केंद्रातून ऑनलाईन पध्दतीने उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, जात पडताळणी, प्रतिज्ञापत्र, ईडब्लूएस प्रमाणपत्र, डोमेसाईल व रहिवाशी दाखला मिळविण्याशिवाय अन्य पर्याय नाही. ऑफलाईन पध्दती बंद केल्या आहेत. एका दिवसात मिळणारे दाखले आठ दिवस झाले मिळत नाहीत. आठ दिवसांचे दाखले मिळतील याबाबत शंका आहे. काही दाखलेही ऑनलाईनच गायब होत आहेत. यामुळे प्रवेश बुडतील की काय या भितीने विद्यार्थी आणि पालक अक्षरशः गॅसवर आहेत. तहसील कचेरीत चकरा मारून येत आहेत. पीएसआय, एसटीआय, एसओ या पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षेच्या अर्जाची मुदत १५ जुलै आहे. ही मुदत उलटून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. महाआयटीचे राज्य व्यवस्थापक राहुल सुर्वे यांनी क्लाऊड सर्व्हरवर जागा उपलब्ध नसल्याचा खुलासा केला आहे. याबाबत सुधारणा करणे किंवा प्रवेश अर्जांची मुदत वाढविणे असे कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत सत्तास्थापने मश्गुल असलेली सरकारी यंत्रणा गांभीर्याने घेताना दिसत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र धोक्यात आले आहे.

नीरा (ता. पुरंदर) येथील केंद्रचालक प्रमोद कदम म्हणाले, काल दिवसभर सर्वर स्लो होता. रात्री आठ ते सकाळी दहापर्यंत पूर्ण बंद पडला होता. पालक-विद्यार्थ्यांच्या संतापाला तोंड देत आहोत. रात्रंदिवस बसून कामाचा प्रयत्न करतो आहोत. उपचारांसाठीचे वैद्यकीय दाखलेही देता येईनात.

कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील केंद्रचालक प्रमोद पानसरे म्हणाले, दोन मिनिटाच्या कामाला अर्धा पाऊण तास लागतोय. आता आम्ही सर्व केंद्रचालकांनी रविवारीसुध्दा सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते आकाश सावळकर म्हणाले, पंधरा दिवस झाले तक्रारी सुरू आहेत आता वाढ होत चालली आहे. मात्र सुस्त असलेली सरकारी यंत्रणा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Pune Elections 2025 : पुणे महापालिकेची नवी प्रभागरचना जाहीर; ४० प्रभाग चार सदस्यांचे, एक प्रभाग पाच सदस्यांचा

SCROLL FOR NEXT