Supriya Sule Esakal
पुणे

Employment : मूकबधिर आणि कर्णबधिरांना मिळणार हक्काचा रोजगार - सुप्रिया सुळे

यशवंतराव चव्हाण सेंटरने आता समाजातील मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याचे ठरवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

यशवंतराव चव्हाण सेंटरने आता समाजातील मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याचे ठरवले आहे.

खडकवासला - यशवंतराव चव्हाण सेंटरने आता समाजातील मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याचे ठरवले आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या सहकार्याने अशा व्यक्तींना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच रिलायन्स स्मार्ट बाजार आणि रिलायन्स स्मार्ट स्टोअर्स मध्ये अशा व्यक्ती नोकऱ्या करताना दिसतील, अशी माहिती खासदार सुळे यांनी दिली. त्यांच्या कल्पनेला रिलायन्स रिटेल लिमिटेडने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट स्टोअरच्या संयुक्त विद्यमाने हे संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे.

पुण्यातील औंध, वाकड, हिंजवडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, गायकवाड नगर, पाषाण, फातिमा नगर, मांजरी, कल्याणी नगर, बीटी कावडे, वाघोली, खराडी, चाकण, आळंदी, मोशी, एरंडवणे, वारजे, नऱ्हे या ठिकाणच्या रिलायन्स स्टोअर्स मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

इच्छुकांनी अर्ज केल्यानंतर योग्य उमेदवार निवडून त्यांना पुण्यातील रिलायन्स स्मार्ट बाजार, रिलायन्स स्मार्ट स्टोअर्समध्ये ट्रेनी कस्टमर सर्व्हीस असोसिएट पदी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी शिक्षणाची बारावी पास ही अट ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मुलाखती दरम्यान १२ वी पास प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, कोरोना लसीकरण प्रमाणपत्र, PAN कार्ड, आधार कार्ड, बँकेचे खाते, पासपोर्ट फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

बारावी पास झालेल्या इच्छुकांनी आपली नावे यशवंतराव चव्हाण सेंटरकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या ५ फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ८४५९९००८३१, ८००७१८२५१० किंवा ८६५२११८९४९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT