crime sakal
पुणे

Pune : आईच्या आत्महत्येत साक्षीदार असलेल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाचा पुढील तपास करा

न्यायालयाचा पोलिसांना आदेश बालग्राम येथे झाला होता मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

न्यायालयाचा पोलिसांना आदेश बालग्राम येथे झाला होता मृत्यू

पुणे : आईच्या आत्महत्या केल्याच्या घटनेस साक्षीदार असलेल्या सात वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणाचा पुढील तपास करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी येरवडा पोलिसांना दिला आहे. न्यायाधीश सी. पी. शेळके यांनी हा आदेश दिला.

कल्याणी गीते असे मृत्यू झालेल्या सात वर्षीय मुलीचे नाव आहे. कल्याणी हिचा २०१३ साली बालग्राममध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणातील विशेष सरकारी वकील राजेश कातोरे यांनी केलेल्या अर्जानुसार न्यायालयाने पुढील तपासाचा आदेश दिला आहे. कल्याणीच्या आईचा मृतदेह काही वर्षांपूर्वी विहिरीत सापडला होता.

तिने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. आईने आत्महत्या का केली याची माहिती कल्याणी आणि तिच्या भावाला आहे. त्यामुळे ते दोघे आईच्या मृत्यूप्रकरणातील साक्षीदार होते. सुरक्षेच्या कारणास्तव कल्याणीच्या मावशीने तिला बालग्राम या संस्थेत पाठवले होते. मात्र संस्थेमध्ये कल्याणीचा मृत्यू झाला होता. निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झालेले आहे.

कल्याणीचा मृत्यू संशयास्पद आहे. तो केवळ निष्काळजीपणामुळे झालेला नाही, असे पुरावे त्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे या खटल्याचे वकील कातोरे यांनी याचा पुढील तपास पूर्ण करण्याची गरज असल्याचा अर्ज २०१९ साली दाखल केला होता. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

गुन्ह्याचा तपास हा सर्व बाजूंनी होणे गरजेचे आहे. पुण्यामध्ये दिलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार कल्याणीचा मृत्यू हा पाण्यात बुडून झालेला आहे. साक्षीदारांचे जबाब तसेच पोस्टमार्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट यामध्ये बरीच तफावत देखील आहे. त्या दृष्टिकोनातून सखोल तपास होणे गरजेचे आहे, अशा पद्धतीने त्यांनी अर्ज केलेला होता.

त्यानुसार या मुद्द्यांवर पुढील तपास पुन्हा करण्याचे आदेश दिलेले आहेत. या तपासातून कल्याणीचा मृत्यू कशामुळे झाला हे लक्षात येईल.

राजेश कातोरे, विशेष सरकारी वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT