पुणे

चरेगावात ऊसाच्या शेतात मृत बिबट्या आढळला : तारेत अडकून दुर्दैवी अंत

CD

उसाच्या पाचटीत आढळला मृत बिबट्या

चरेगावमधील प्रकार; अंदाजे दहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज

उंब्रज, ता. २० : चरेगाव (ता. कऱ्हाड) येथे उसाच्या शेतात मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. धारकरा मळा शिवारातील उसाच्या फडात पाचटीमध्ये हा बिबट्या पडलेला दिसून आला. प्राथमिक माहितीनुसार अंदाजे आठ ते दहा दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.


चरेगाव येथे आज सकाळी सदाशिव दबडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना पाचटीमध्ये तीव्र दुर्गंधी जाणवली. पाहणी केली असता उसाच्या शेतातील तारेत अडकलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती तत्काळ ग्रामस्थ व वन विभागाला देण्यात आली. चरेगाव व परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याची माहिती यापूर्वीही समोर आली आहे. अनेक वेळा ग्रामस्थांना नागरी वस्तीत तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण होते. मात्र, या घटनेनंतर वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित बिबट्या तारेत अडकल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी अधिकृत कारण स्पष्ट होण्यासाठी वन विभागाकडून पंचनामा व तपास हाेणे अपेक्षित आहे.
-------

B00781
चरेगाव : उसाच्या पाचटीमध्ये तारेत अडकलेला मृत बिबट्या.
.......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

SCROLL FOR NEXT