coronavirus 
पुणे

येरवड्यातील ‘हॉटस्पॉट’ परिसरातील दारू विक्री करणाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळवृत्तसेवा

येरवडा - येरवड्यातील ‘हॉटस्पॉट’ परिसरात रात्रभर दारू विक्री करणाऱ्या युवकाचा सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. संबंधित युवकाच्या कुटुंबातील सर्वांना क्वारंटाईन केले आहे. मात्र, संबंधित युवकाने कितीजणांना दारू विक्री केली, याची माहिती मिळणे अवघड असल्यामुळे पोलिसांसह येरवडा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. 

पर्णकुटी व लक्ष्मीनगर पोलिस चौकीच्या हद्दीत गावठी दारूची विक्री होत असल्याची बातमी 17 एप्रिलला ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर किरकोळ कारवाई करून सोडून दिले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्णकुटी पोलिस चौकीच्या हद्दीतील हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहत असलेला हा युवक रात्रभर गावठी व विदेशी दारू, ताडी विक्री करीत होता. त्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र येरवडा पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. 

डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात युवकाची आरोग्य तपासणी केली होती. त्याला कोरोना संशयीत म्हणून रुग्णालयात दाखल केले होते. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण झाले होते. उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. 
- डॉ. माया लोहार, वैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT