Pravin Zumkude sakal
पुणे

Sinhgad Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या कंपनी कामगाराचा मृत्यू

पुणे-पानशेत रस्त्यावरील वरदाडे येथील घटना; हत्येची शक्यता लक्षात घेऊन हवेली पोलीसांचा तपास सुरू

निलेश बोरुडे

सिंहगड - पुणे-पानशेत रस्त्यावरील वरदाडे येथील कंपनीत आज पहाटेच्या सुमारास गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. प्रवीण बाबासाहेब झुमकुडे (वय 35, रा. वरदाडे कर्मचारी वसाहत, ता. हवेली जि. पुणे. मुळ रा. नांद्रे ता. मिरज जि. सांगली) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून हत्येची शक्यता लक्षात घेऊन हवेली पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

आज पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास वरदाडे येथील नामांकित कंपनीच्या कर्मचारी वसाहतीत राहण्यास असलेला प्रवीण झुमकुडे हा गळा चिरुन गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना आढळून आला. संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, 'डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गळ्यावर खोल जखम आढळली असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. घटना कशी घडली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही परंतु शवविच्छेदन अहवाल व तपासातून सर्व स्पष्ट होईल', अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT