Death of fish in Jambhulwadi lake due to sewage water pollution pune
Death of fish in Jambhulwadi lake due to sewage water pollution pune sakal
पुणे

Jambhulwadi Lake Fish : मैलापाण्यामुळे जांभूळवाडी तलावातील माशांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जांभूळवाडी तलावातील माशांचा मृत्यू तलावात येणार्या मैलापाण्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. माशांच्या मृत्यू संदर्भात मॉर्डन महाविद्यालयाच्या मत्स्यरोग निदान आणि गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेने केलेल्या चाचणीतून हे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयास प्राप्त झाला आहे.

जांभूळवाडी येथील तलावातील मासे मृत्यूचे दीड आठवड्यापुर्वी समोर आलता. माशांच मृत्यू का झाला याचे कारण शोधण्यासाठी पाण्याची तपासणी करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली होती. त्यामुळे धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाने मॉडर्न महाविद्यालयास पत्र पाठवित मत्स्यरोग निदान आणि गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेकडून जांभूळवाडी तलावाच्या पाण्याची तपासणी करण्याची विनंती केली होती.

महाविद्यालयाने गेल्या आठवड्यात तलावातील पाण्याचे नमुने घेतले होते, त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पाण्यातील तापमान व ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे निष्कर्षही या अहवालात नमूद केले सामाजिक कार्यकर्ते संतोष साठे यांनी माहिती अधिकारा अंतर्गत हा अहवाल मिळविला आहे.

जांभुळवाडी तलावाच्या सुरक्षेकडे महापालिकच्या पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा विभाग, मल:निसारण विभागाने दुर्लक्ष केल्याने संबंधित कारल्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी साठे यांनी केली आहे.

अहवालाचे निष्कर्ष

-तलावात सोसायट्यांचे मैलापाणी पाणी थेट येणे मिश्रीत होणे

- तलावात गाड्या धुवणे, कपडे धुवणे, बांधकामांचा राडारोडा टाकणे यामुळेही प्रदूषणात वाढ.

- पाण्यामधे डिझॉल्व ऑक्‍सिजन अतिशय कमी असणे

- तलावात विषारी धातूंचे प्रमाण आढळून आले.

- तलावात खारट पाण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT