death  sakal
पुणे

प्रमाणपत्रासाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यु

कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नोकरीसाठी आवश्‍यक चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक दिवस हेलपाटे मारूनही पोलिसांकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने बुधवारी पोलिस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यु झाला. हि घटना बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली होती. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

सुरेश विठ्ठल पिंगळे (वय 42, रा. खडकी) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पिंगळे हे त्यांच्या कुटुंबीयांसह खडकीतील आंबेडकर चौकाजवळ राहतात. त्यांना एका खासगी कंपनीत कार्यालयीन कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली होती. या नोकरीसाठी त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्‍यकता होती. चारित्र्य पडताळणीसाठी त्यांनी एक जुलै रोजी पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र पत्ता चुकीचा असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करून त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची पोलिसांनी सूचना केली होती. दरम्यान, 22 जुलैला नाम साध्यर्मामुळे समर्थ, कोथरूड, सहकारनगर पोलिस ठाण्यांतर्गत पिंगळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल असल्याचे संगणक प्रणालीमध्ये दिसून आले होते. त्यानंतर पुन्हा त्यांचा अर्ज पडताळणीसाठी पाठविण्यात आला. 27 जुलैला तक्रारींचे निवारण करून अर्ज स्वीकारण्यात आला होता.

चारित्र्य पडताळणीचा दाखला मिळविण्यासाठी पिंगळे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोलिस आयुक्तलयाजवळच्यान तक्रार निवारण खिडकीजवळ आले होते. त्याठिकाणी त्यांच्या शंकेचे निराकरण झाले नाही. त्यामुळे दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास विमनस्क अवस्थेत त्यांनी हाताची नस कापून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले होते. पेटलेल्या अवस्थेतच पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून गुन्हे शाखेच्या कार्यालयानजीक मंदिरापर्यंत धाव घेतली. पोलिस कर्मचा-यांनी चादर आणि पोत्याच्या साह्याने त्याच्या अंगावरील आग विझविली. त्यानंतर त्यांना तत्काळ पोलिस रुग्णवाहिकेतून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. ते 90 टक्के भाजल्याने डॉक्‍टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचारास सुरूवात केली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी रुग्णालयात जाऊन पिंगळे यांची भेट घेतली होती. दरम्यान, उपचार सुरू असतानाच गुरूवारी सायंकाळी साडे सहा वाजता त्यांचा मृत्यु झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT