Death of Two Wheeler rider in accident in  pune
Death of Two Wheeler rider in accident in pune 
पुणे

पुणे : कात्रज बोगद्यात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रात्रपाळी संपवून दुचाकीवरून घरी निघालेल्या एका नागरििकाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता कात्रज नवीन बोगद्याच्या परिसरात घडली. 

सुनील सोपान शिंदे (वय 45, रा. शिंदेवाडी, ता. भोर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. सोमवारी त्यांची रात्रपाळी होती. ते रात्रपाळीचे काम संपवून मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या मुंबई बंगळुरू महामागावरील नवीन कात्रज बोगद्याजवळून जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकी खाली पडून शिंदे यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहन देशमुख करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT