0accident_86.jpg 
पुणे

 दुभाजक ओलांडताना टँकरच्या धडकेने महिलेचा मृत्यु

रमेश धायगुडे, लोणंद.

लोणंद : लोणंद- फलटण रस्त्यावर तरडगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत पालखी तळानजीक काल (ता.१५) रात्री १२.३० च्या सुमारास रस्ता दुभाजक ओलांडत असताना लोणंद बाजूकडून वेगात येणाऱ्या टँकरने जोरदार धडक देवून झालेल्या आघातात महाबळेश्वर येथील ४२ वर्षाय महिला जागीच ठार झाली.

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती नुसार श्री. संत ज्ञानेश्वर माउलींच्या देवदर्शनासाठी महाबळेश्वर येथील विशाल रतीकांत तोष्णिवाल व त्यांची पत्नी कविता विशाल तोष्णिवाल हे तरडगाव येथे आले होते. तरडगाव पालखी तळावर रात्री बारा वाजता माउलींचे दर्शन घेवून पुन्हा घरी परतण्यासाठी लोणंद- फलटण रस्ता क्रॉस करुन रस्त्यापलीकडे लावलेल्या गाडीकडे जाण्यासाठी रस्ता दुभाजक ओलांडताना रस्त्यावर पाउल टाकत असतानाच लोणंद बाजूकडून फलटणकडे भरधाव वेगात निघालेला टँकरने (एमएच १० झेड - २७०८) जोरदार धडक देवून गंभीर कविता यांना गंभीर जखमी केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्या मृत्यू पावल्या. टँकर चालक यशवंत रंगनाथ पावले (वय ३० रा. पावलेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) याच्या विरुद्ध विशाल तोष्णिवाल (वय ४६ रा. डॉ. साबळे रोड,महाबळेश्वर, जि. सातारा ) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिस हवालदार श्री. दिघे हे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT