पुणे

मलकापूर शिवसेनेचे निवेदन

CD

हातगाडा अतिक्रमणे, बेकायदेशीर पार्किंगवर कार्यवाही करा

शिवसेनेचे निवेदन; ढेबेवाडी फाट्यावरील समस्याप्रकरणी करणार आंदोलन

मलकापूर, ता. २० : येथील ढेबेवाडी फाट्यावर कृष्णा सरिता महिला बाजारसमोर विनापरवाना हातगाडा व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे व बेकायदेशीर पार्किंगबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा पालिकेसमोर या प्रश्नी व्यापक धरणे आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला. कार्यालयीन अधीक्षक अभिजित ढाणे यांनी हे निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले, की मलकापूर- ढेबेवाडी मार्गावर सरिता बाजार लगत संपूर्ण लेनवर हातगाडी व्यावसायिकांनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. या ठिकाणी बेकायदेशीर पार्किंग होत आहे. यामुळे संबंधित रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासात सामोरे जावे लागत आहे. याचा वाहतुकीवर परिणाम होऊन अपघाताची शक्यता आहे. याचे गांभीर्य ओळखून अतिक्रमण पथक प्रमुखांनी या ठिकाणचा सर्व्हे करावा. बेकायदेशीर विनापरवाना अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाडी मालक व धारकांवर कारवाई करण्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत. नगरपालिक कायद्यातील तरतुदीनुसार फेरीवाला झोन निर्मिती करून फेरीवाल्यांना वाहतुकीस अडथळा येणार नाही, अशा पद्धतीने जागा नेमून द्याव्यात. सम- विषम तत्त्वावर दुचाकी पार्किंग करता व्यवस्था करावी.
याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा हा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिकेसमोर व्यापक धरणे आंदोलन करावे लागेल.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक नितीन काशीद, मधुकर शेलार, नीलेश सुर्वे, संजय चव्हाण, विद्यानंद पाटील, प्रफुल्ल बाबर, सद्दाम शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
.....
A01321
मलकापूर : अभिजित ढाणे यांना निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी.
.................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT