पुणे

डेक्कन कॉलेजचा पदवी प्रदान सोहळा मंगळवारी

CD

पुणे, ता. २ : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा (अभिमत विद्यापीठ) १४वा पदवी प्रदान सोहळा मंगळवारी (ता. ६) आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. एस. गुरुमूर्ती हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. पदवी प्रदान सोहळा डेक्कन कॉलेजच्या मैदानातील सभागृहात सकाळी साडेदहा वाजता आयोजित केला आहे.
या सोहळ्यात एकूण १६४ पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. याशिवाय १२ पीएच.डीधारकांना प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र, भाषाविज्ञान आणि संस्कृत व कोशशास्त्र या विषयांत पीएच.डी. दिली जाणार आहे. डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
कार्यक्रमात प्रा. एस. गुरुमूर्ती यांचे सार्वजनिक जीवन, अर्थव्यवस्था, प्रशासन आणि भारताच्या सांस्कृतिक, सभ्यता दृष्टिकोनाशी संबंधित राष्ट्रीय पातळीवरील चर्चांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. कार्यक्रमात नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि प्रख्यात भाषा वैज्ञानिक प्रा. कपिल कपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत आणि प्राकृत भाषा विभागाच्या माजी विभागप्रमुख, संस्कृत विदुषी प्रा. सरोजा भाटे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे माजी प्रादेशिक संचालक आणि पुरातत्त्वज्ञ के. के. मुहम्मद यांना ‘मानद डी. लिट’ पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी पदवी प्रमाणपत्रे, तसेच विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT