Deccan-Express 
पुणे

डेक्कन एक्‍स्प्रेस आता नव्या दिमाखात

सकाळवृत्तसेवा

पुणे - मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोकप्रिय असलेली डेक्कन एक्‍स्प्रेस गुरुवारपासून (ता. ५) नव्या रूपात धावणार आहे. या गाडीच्या रंगसंगतीपासून डब्यांमधील अंतर्गत रचनेतही बदल केला आहे. 

डेक्कन एक्‍स्प्रेसला पूर्वी १७ डबे होते; परंतु, आता नव्या स्वरूपात १६ डबे असले तरी, पूर्वीच्या तुलनेत आसन क्षमता कमी झालेली नाही. नव्या डब्यांची अंतर्गत रचना बदलली आहे. तसेच, या डब्यांचा आकारही मोठा आहे. त्यात आसन क्षमता वाढविली आहे.

त्यामुळे एक डबा कमी होऊनही आसन क्षमतेत बदल झालेला नाही. नव्या डब्यांत सीट अधिक आरामदायी केले आहेत. तसेच आकर्षक रंगसंगती करून खाली मॅटही टाकले आहे. या गाडीत वातानूकल चेअर कार असून जनरल डबेही आहेत. मुंबईवरून ही गाडी सकाळी सव्वा सातच्या सुमारास निघेल आणि सकाळी पावणे अकराच्या सुमारास पुणे स्टेशनवर पोचेल, तर पुण्यावरून दुपारी सव्वातीन वाजता मुंबईकडे सुटेल. 

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी डब्यातील बदलाचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘या गाडीचे १६ डबे असले तरी, त्यांची संख्या २४ पर्यंत वाढविणे शक्‍य आहे. कारण, उन्हाळ्यात सुट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढते. टोलची रक्कम वाढल्यामुळे प्रवासी आता रेल्वेस प्राधान्य देऊ लागले आहेत. याचा रेल्वे प्रशासनाने विचार केला पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्याचा ठिय्या

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

SCROLL FOR NEXT