Deccan Literature Festival Sakal
पुणे

Deccan Literature Festival : शनिवार-रविवारी रंगणार डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल

दिग्गजांच्या मुलाखतींसह भरगच्च सांस्कृतिक मेजवानी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सौरभ शुक्ला, वामन केंद्रे, देवदत्त पट्टनाईक अशा दिग्गजांच्या मुलाखतींसह कविता, नाटक, चर्चासत्रे अशी भरगच्च सांस्कृतिक मेजवानी देणारा डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल येत्या शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) रंगणार आहे. दखनी अदब फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात दोन्ही दिवशी सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत पार पडेल.

फाउंडेशनचे संचालक जयराम कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. महोत्सवाचा प्रारंभ ‘सौरभ शुक्ला : एक सुगंधित प्रवाह’ या सौरभ शुक्ला यांच्या संवादात्मक कार्यक्रमाने होणार आहे. ‘दोन शतकांच्या सांध्यावरील मराठी कविता’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्यासह विविध कवी आपल्या कविता सादर करतील.

सायंकाळच्या सत्रात ‘शब्द संवाद - समकालीन हिंदी साहित्य’ हे चर्चासत्र, पं. रामदयाल शर्मा यांचा ‘नौटंकी’ हा लोककलेवर आधारित कार्यक्रम आणि ‘पोएट्री ऑफ यंगिस्तान’ हा युवा कवींच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम होईल. दिवसाचा समारोप ‘रंग- ग्रँड मुशाहिरा’ या कार्यक्रमाने होईल.

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘प्रा. वामन केंद्रे- एक व्रतस्थ समर्पित रंगकर्मी’ आणि ‘डिकोडिंग दी स्टोरीज ऑफ गॉड्स अँड सेंट्स’ या कार्यक्रमांमध्ये अनुक्रमे ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे आणि लेखक-वक्ते देवदत्त पट्टनाईक संवाद साधतील. ‘मराठी साहित्यसंवाद - त्रिधारा’ या संवादात्मक कार्यक्रमानंतर ‘हमसफर’ हे हिंदी नाटक सादर होईल.

सायंकाळच्या सत्रात मोनिका सिंग आणि कवी वैभव जोशी यांचा ‘हमनवा - कविता और गझल की मेहफिल’ आणि सुरेंद्र शर्मा यांचा ‘हास्य कविता - मुझसे भला न कोई’ हा कार्यक्रम रंगेल. महोत्सवाचा समारोप उस्ताद शुजात खान यांच्या ‘सुफी म्युझिकल इव्हिनिंग’ या सांगीतिक कार्यक्रमाने होईल. महोत्सवासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असून इच्छुकांनी संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन फाउंडेशनने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

IPL 2026 : शाsssणा... Rohit Sharma ने कुलदीप, लोकेश यांना 'मामू' बनवलं; प्रसंग सांगताना हिटमॅन खळखळून हसला Video

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

"मी पैशांसाठी बिग बॉस केलं" लपंडाव फेम रुपालीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT