crime sakal
पुणे

मूकबधिरांकडून ५५७ मूकबधिरांची फसवणूक; पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष

गुंतवणूक केलेली रक्कम दोन महिन्यात दामदुप्पट करून देण्याच्या आमिषाने ५५७ मूकबधिरांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

प्रशांत पाटील

पुणे - गुंतवणूक केलेली रक्कम दोन महिन्यात दामदुप्पट करून देण्याच्या आमिषाने ५५७ मूकबधिरांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणारे आरोपीही मूकबधिरच आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे.

नव्याने अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने २० तर यापूर्वी अटक केलेल्या तिघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर महिला आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी हा आदेश दिला आहे. पाच जणांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी केली. धनंजय सुदामराव जगताप (वय ३९, रा. आंबेगाव) याला २० तारखेपर्यंत, तर अभिजर सैफुद्दीन घोडनदीवाला (वय ३२, रा. साळुंखे विहार), प्रदीप महारूद्र कोलते (वय २९, रा. चिंचवड) आणि सुयोग सुधीर मेहता (वय ३३, रा. धायरी) या तिघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आतापर्यंत आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

सर्व आरोपी मूकबधिर आहेत. दुभाषिकांच्या माध्यमातून तपास करावा लागत आहे. त्यामुळे तपासासाठी जास्त कालावधी द्यावा. आरोपींचा हा गुन्हा करण्याचा हेतू काय आहे? परताव्याच्या आकर्षक स्कीमचे वेगवेगळे पॉम्पलेट कुठे व कसे बनवले? याचा तपास करायचा आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. वाडेकर यांनी केली.

गुन्ह्याची व्याप्ती देशभर

आरोपींनी गुन्ह्यातून आलेल्या पैशांचा वापर करीत महागड्या गाड्या विकत घेतल्या आहेत. या वाहनांचा शोध पोलिस घेत आहे. केरळ, राजस्थान, दिल्ली, हरियाना, पंजाब, सिक्कीम, गुजरात अशा विविध राज्यातील मूकबधिरांची देखील आरोपींनी फसवणूक केलेल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT