पुणे

गाडेबगाडासाठी प्रसिध्द असणारी केंदूरची बगाड यात्रा रद्द

भरत पचंगे

शिक्रापूर : गाडेबगाडांच्या मिरवणूकीने आणि भक्तांच्या बगाड झुंबडीसाठी प्रसिध्द असलेल्या केंदूर (ता.शिरूर) येथील श्री काळभैरवनाथ सायंबा महाराजांची बगाडे यात्रा नुकतीच रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमेटीने घेतला. मंगळवार व बुधवार अशा दोन दिवसांसाठी यावर्षीच्या यात्रेचा मुहुर्त होता.

राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा दिवंगत खासदार बापूसाहेब थिटे यांचे मुळ गाव असलेल्या केंदूर गावातील त्यांच्याच घराण्यासह संपूर्ण गावाचे कुलदैवत असलेल्या काळभैरवनाथ श्री सायंबा महाराजांची यात्रा मंगळवार (ता.१५) व बुधवार (ता.१६) अशा दोन दिवसांसाठी हिंदू रितीरिवाज व मुहुर्ताप्रमाणे भरणार होती. मात्र कोरोनाचे संकट, शासनाने लावलेले १४४ कलम आणि कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने यावर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमेटीने घेतल्याची माहिती यात्राकमिटीचे वतीने सुर्यकांत थिटे, राजेश थिटे, डि. के. थिटे, माऊली थिटे यांनी दिली.

दरम्यान सायंबा देवाचे लग्नविधीचा कार्यक्रम उद्या सोमवारी (ता. १४) रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार असून यासह मुळ यात्रेचे दिवशी सकाळचे पुजाविधी, नैवेद्य तसेच ज्यांचे या धार्मिक कार्यक्रमात विधीवत मान आहेत त्यांनाच निमंत्रित करुन त्यांच्या उपस्थितीत सर्व विधी पार पाडले जाणार असून गाडेबगाड वा इतर जाहिर कार्यक्रम तसेच सोशल डिस्टंसिंगला बाधा येणारे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत याची यात्रा कमेटी दक्षता घेणार असल्याचेही यात्राकमेटीचे वतीने सांगण्यात आले.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT