varsha gaikwad 
पुणे

बोर्डाच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

सकाळवृत्तसेवा

पुणे : ‘‘विद्यार्थ्यांचे आरोग्य ही राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत लवकरच संवाद साधण्यात येईल,’’ अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्याची चिन्हे आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विविध स्तरातून परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकौंऊटवरून (फेसबुक आणि ट्विटर) शुक्रवारी सायंकाळी संवाद साधला. ‘विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून सरकार प्रयत्न करत आहे.’, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा - पुणेकरांनो सवलतींचा गैरवापर नको; लॉकडाऊनमध्ये विनाकारण हिंडणाऱ्यांवर कारवाई
गायकवाड म्हणाल्या,‘‘एकीकडे अभ्यासाचा ताण, तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत बोर्डाची परीक्षा कशी द्यावी, याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये अस्वस्थता आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही विविध चर्चासत्रे आयोजित केली. शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. तसेच टिसीएस, गुगल इंडिया यांच्याशी संवाद साधला आहे. त्याशिवाय अन्य विभागांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करत आहोत. जिल्हाधिकारी पातळीवरही शिक्षण विभागामार्फत पाठपुरावा सुरू आहे. परंतु विद्यार्थ्यांचे आरोग्य ही महाविकास आघाडी सरकारची सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत लवकरच सवाद साधण्यात येईल.’’ दरम्यान विद्यार्थ्यांनी सुरक्षित रहा आणि अभ्यास करत रहा, असा सल्ला गायकवाड यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : सरकारने घरगुती LPG बुकिंगचे नियम बदलले, आता २१ दिवसांपूर्वी बुक होणार नाही दुसरा सिलिंडर, कारण काय ?

Kolhapur College Crime: इंजिनियरींगच्या ५ विद्यार्थिनींना प्राध्यापकाने केबीनमध्ये बोलवलं अन् घडलं भयानक; कोल्हापूरमध्ये प्रकार

Latest Marathi News Live Update : तिसऱ्या टी२० विजेतेपदासाठी भारत न्यूझीलंडला भिडणार! सेलिब्रेटिंची अहमदाबादमध्ये हजेरी

T20 World Cup मधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंड मायदेशी मग आम्हीच भारतात का अडकलो? द. आफ्रिका-वेस्ट इंडिज खेळाडू ICC वर तापले

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

SCROLL FOR NEXT