gai.jpg 
पुणे

पुणे : 'ही' बातमी ऐकून शिक्षणमंत्रीही झाल्या थक्क; शाळांबाबतचा महत्वाचा निर्णय केला जाहीर

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या काळात नकारात्मक बातम्यांची संख्या कमी नाही. त्यात अफवांचे पीकही उठते. एक आवई अशीच उठली आहे की राज्य सरकारने चार हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे... हे ऐकून खुद्द शालेय शिक्षणमंत्रीही थक्क झाल्या आहेत. असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी या अफवेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्री असताना ग्रामीण भागातील कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता नवे सरकार सत्तेत आहे, कोरोनाच्या काळात कोणत्याही शैक्षणिक घडामोडी होत नाहीत, अशा काळात पुन्हा शाळा बंद करण्याची बातमी माध्यमे आणि समाज माध्यमात आली आहे.

नव्या सरकारचा हा निर्णय कधी झाला, कुठे झाला याचा कोणताही तपशील बातमीत नाही. अधिकारी स्तरावरूनही या बातमीला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र मराठी सक्तीची मागणी लावून धरणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी देखील मराठी शाळा बंद केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठविली आहेत. मात्र शाळा बंद करण्याचा निर्णय कधी झाला हे त्यांनाही माहीत नाही.

 शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप आणि माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ही बातमी म्हणजे अफवा असल्याचे म्हटले आहे. शिक्षण संचालनालय आणि मंत्रालय स्तरावरही शाळा बंद बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्र्यांनी देखील याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत, तरीही शाळा बंद केल्याच्या बातम्या कशा काय दिल्या जातात? अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती समजून घेतली जात नाही, एखादी निराधार बातमीवरून अनेक लोक पत्रव्यवहार सुरू करतात. अशा बातम्यांमध्ये सरकारी दुजोरा असल्याशिवाय विश्वास ठेऊ नये, असे आवाहन या अधिकाऱ्यांनी केले. 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निदर्शनास या अफवेची बाब आणून दिली असता त्याही थक्क झाल्या. सकाळशी बोलताना त्या म्हणाल्या, "लॉकडाऊन सुरू आहे, केवळ परीक्षांची चर्चा सुरू होती. या काळात शाळा बंद करण्याबाबत कोणताही चर्चा झालेली नाही. त्यामुळे निर्णय होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. अशा बातम्या कशा दिल्या गेल्या याची चौकशी केली जाईल. मात्र सध्यातरी शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT