mpsc 
पुणे

"एमपीएससी'चे लवकरच ऍप; सर्व सुविधा मोबाईलवर

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार सुधारावा, गतिमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असत असतात. त्यात दृष्टीने "एमपीएससी' एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोईसाठी ऍप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात. पुणे, मुंबई, औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील "एमपीएससी'च्या अभ्यासासाठी येतात. पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात. तर महाराष्ट्रभरातून किमान 3 ते 4 लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"एमपीएससी'चा अभ्यास करताना आयोगाकडून येणाऱ्या सूचना, बदललेले नियम, अभ्यासक्रम, वेळपत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक, परीक्षा अर्ज भरणे, हॉल तिकीट, परीक्षेचा निकाल, त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळासाठी अवलंबून रहावे लागते. मोबाईलवर संकेतस्थळ गैरसोयीचे ठरत आहे. परीक्षा अर्ज मोबाईलवरून भरताना अवघड जाते, त्यामुळे इंटरनेट कॅफेवर जावे लागते. ही गैरसोय लक्षात घेऊन 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'ने ऍप विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

काय असणार ऍपमध्ये 
ऍपमध्ये 'एमपीएससी'च्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळून सर्व गोष्टी ऑनलाईन करता येणार आहेत. आयोगातर्फे दरवर्षी किती परीक्षा घेण्यात येतात, किती जिल्ह्यात किती सेंटर असतात, तेथे वर्ग खोल्या किती असतात, एका वर्गात किती उमेदवार परीक्षा देतात यापासून ते परीक्षा अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, प्रत्येक परीक्षेची पात्रतेची नियमावली, निकाल लागल्यानंतरची प्रक्रिया याचाही विचार करण्यात आला आहे. हे ऍप खासगी कंपनीने तयार केले तरी याची मालकी "एमपीएससी'कडे असणार आहे. तसेच उमेदवारांची वैयक्तिक माहिती, ऍपची सायबर सुरक्षा याला ही महत्व देण्यात येणार आहे. 

दिव्यांग फ्रेंडली ऍप 
राज्य शासनाच्या पदभरतीमध्ये दिव्यांगांसाठी पदे आरक्षित असतात. त्यांनाही हे ऍप वापरणे सोपे जावे याचा विचार केला आहे. तसेच चाट विंडो, परीक्षा केंद्राचे लोकेशन, फिडबॅक, थम इंप्रेशन सह लेखी स्पष्टीकरण, तसेच वेगवेगळ्या अंगलमधून लाईव्ह फोटो काढण्याची व्यवस्था या ऍपमध्ये असणार आहे. 

दृष्टीक्षेपात एमपीएससी 

36 - जिल्ह्यात होते परीक्षा 
10 - वर्षभरात परीक्षा 
1200 - राज्यातील परीक्षा केंद्र 
1 ते 150  - एका जिल्ह्यात परीक्षा केंद्र 
15000 -  एकूण वर्गखोल्या 
1900  -  एका जिल्ह्यात जास्तीत जास्त खोल्या 
504  - एका केंद्रावरचे कमाल विद्यार्थी 
24 -  एका खोलीत कमाल विद्यार्थी 
1 ते 3 -  परीक्षेचे दिवस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेचे आस्ते कदम! तेजस एक्स्प्रेस १२ तास लेट; मांडवी, कोकणकन्याही ४ तास उशिरा, चाकरमानी हैराण

RCB vs GT Final: विराट कोहली-साई सुदर्शन भिडले, भर मैदानातच एकमेकांशी वाद घालतानाचा Video Viral

Mumbai Weather: उकाडा दूर होणार, मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार; आएमडीचा सतर्कतेचा इशारा

Amravati: फ्रेजरपुरा हादरला! १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा गंभीर आरोप; अमरावतीत खळबळजनक घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

रोज सकाळी फक्त १०० उड्या मारा; शरीरात दिसतील असे बदल की तुम्हीही थक्क व्हाल, यास्मिन कराचीवालांचा खुलासा

SCROLL FOR NEXT