The decision of the examination should be taken by the state government.jpg 
पुणे

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय राज्य सरकारनेच घ्यावा : 'मासु'ची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : "महाविद्यालयीन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्य सरकारला पूर्ण स्वतंत्र्य दिले असताना अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यासाठी 'यूजीसी'ला पत्र पाठविण्याची गरज नाही. राज्य सरकारने स्वतःच्या अधिकारात परीक्षा रद्दचा निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे (मासु) अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी 'यूजीसी'ला पत्र पाठवले आहे. मात्र 'यूजीसी'च्या परीक्षे बाबतच्या मार्गदर्शन सुचनेमध्ये कुठेही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजे असे नमूद केलेेले नाही. याउलट यूजीसीने संपूर्ण स्वायत्तता विद्यापीठांना दिलेली असू, जर आपल्या भागात 'कोरोना' विषाणूंचा प्रादुर्भाव टाळता येत नसेल तर मार्गदर्शक सूचनेतील परिच्छेद क्रमांक ५ प्रमाणे विद्यार्थ्यांना सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत असे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करून पुर्वीच्या कामगिरीवर निकाल लावता येणे शक्य आहे. 
 
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उदय सामंत यांनी हे पत्र यूजीसीला कशासाठी पाठविले याची कल्पना करता येत नाही. शिक्षण हे राज्याच्या अखत्यारीत येते मग राज्याने यावर स्वतः निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहिजे, असे इंगळे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT