

Ashish Nehra Fumes as Shubman Gill’s Overthrow
Sakal
Ashish Nehra's Reaction : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत बुधवारी (८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अत्यंत रोमांचक सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) अखेरच्या चेंडूवर १ धावेने विजय मिळवला.
या सामन्यात दोन्ही संघात शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी थरार पाहायला मिळाला होता. या सामन्यात अनेक नाट्यमय क्षण आले. अशाच एका क्षणी गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) प्रचंड चिडल्याचे दिसला होता.