Warii 
पुणे

माउली, यंदाच्या आषाढी वारीसाठी घेतलाय हा निर्णय...

विलास काटे

आळंदी (पुणे) : ""वारकरी संप्रदायाची परंपरा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पालखी सोहळा यंदाही साजरा केला जावा. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आरोग्याचे रक्षण आणि लॉकडाउननंतरच्या स्थितीचा विचार केला जाईल. सोहळ्याच्या स्वरूपाबाबत अंतिम निर्णय सरकारशी विचारविनिमय करून घेतला जाईल,'' अशी माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे यांनी दिली. 

आषाढी वारीबाबत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या प्रमुखांची मानकरी, वारकरी-फडकरी, दिंडीकरी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे, पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, ऊर्जितसिंह शितोळे सरकार, देवव्रत वासकर महाराज, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, डॉ. अभय टिळक, डॉ. अजित कुलकर्णी, योगेश देसाई, लक्ष्मीकांत देशमुख, माऊली महाराज जळगावकर, मारुती महाराज कोकाटे, विठ्ठल महाराज वासकर, दादामहाराज शिरवळकर, रामभाऊ चोपदार आदींनी चर्चेत सहभाग झाले. 

या पूर्वीही आली होती संकटे 
पंढरीची वारी हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. घरात कितीही अडचण आली, नैसर्गिक आपत्ती आली, तरी वारकऱ्यांनी पंढरीची वारी कधी चुकविली नाही. या पूर्वी सन १८६५ मध्ये राज्यात कॉलराची साथ आली होती. त्याकाळी संपूर्ण पंढरपूर शहर रिकामे करण्यात आले होते. परंतु, पंढरीची वारी चुकली नाही. सन १८९८ व १९५६ ला चंद्रभागेला महापूर आला होता. संपूर्ण पंढरपूर शहराला पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. त्याकाळात संतांच्या पालख्या वाखरीला थांबविण्यात आल्या होत्या व फक्त मानकरी होडीतून पादुका पांडुरंगाच्या भेटीला घेऊन गेले होते. सन १९१८ व १९४६ मध्ये राज्यात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी ऐन वारीत पंढरपूर शहर रिकामे करण्यात आले होते व फक्त संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीला आणण्यात आल्या होत्या. मागील इतिहास पाहिला, तर अनेक मोठी संकटे आली असतानाही वारकऱ्यांची पंढरीची वारी चुकली नाही. 

...तर मोठी किंमत मोजावी लागणार 
आज मात्र केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर लाखो लोकांना याची लागण झाल्याचे सध्याचे चित्र आहे. मुख्यत्वे हा रोग संसर्गामुळेच वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने चैत्री वारीवर बंदी आणली आहे . चैत्री वारीला श्री क्षेत्र पंढरपूरला महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा प्रांतातून लाखो लोक येतात. या वारकऱ्यांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये व देशावर मोठे संकट येऊ नये म्हणूनच चैत्री वारीला बंदी घालण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता दररोज रुग्ण वाढताना दिसत आहेत. महाभयंकर संकट पाहता या लाखोंच्या जनसमुदयामुळे कोरोनासारखा विषाणू फैलावण्यासाठी मदतच होणार आहे आणि त्यातून मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे सरकार नेमका काय निर्णय घेणार, याकडे वारकरी लक्ष ठेवून आहेत. 

वारकरी सकारात्मक 
कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी वारकऱ्यांना अवधी मिळणे गरजचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर वारकऱ्यांशी चर्चा करावी, अशी अपेक्षा वारकरी संप्रदायात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वारकरी सकारात्मक आहेत. त्यामुळे पंढरपुरातील चैत्र वारी या पूर्वी रद्द केली. मात्र, वारीची परंपराही जपली पाहिजे. त्यासाठी आषाढी वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या प्रमुख संतांच्या पालख्यांच्या प्रस्थानचे नियोजन कसे करावे, यासाठी प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील तमाम वारकऱ्यांना आता फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाच आधार आहे. ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT