lock down 
पुणे

पूर्व हवेलीतील या सात गावांतील व्यवहारांबाबत हा घेतलाय निर्णय 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह सात गावे कंटेनमेंन्ट (प्रतिबंधित) झोनमध्ये आहेत. त्यामुळे या सात गावात मेडिकल, दवाखाना, भाजीपाला व दूध वितरण यासारख्या अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे व्यवसाय 18 मेपर्यंत बंदच राहणार असल्याचे हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी यांनी जाहीर केले. 

उरुळी कांचन व कदमवाकवस्ती हद्दीत तेरा दिवसांपूर्वी कोरोनाचे चार रुग्ण सापडले. त्यामुळे पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, नायगाव, सोरतापवाडी व शेवाळेवाडी या सात गावांत 20 एप्रिलपासून कंटेनमेंन्ट झोन जाहीर केलेला आहे. कंटेनमेंन्ट झोनची मुदत 28 दिवसांची आहे. सरकारने सोमवारपासून (ता. 4) जिल्ह्याच्या काही भागात काही अटीवर व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी या सात गावात मात्र 18 एप्रिलपर्यंत व्यवहार सुरू करता येणार नाहीत, असे कोळी यांनी स्पष्ट केले. 

या सात गावात अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारचे व्यवसाय 18 मेपर्यंत सुरू करता येणार नसल्याच्या वृत्तास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दुजोरा दिला आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईबरोबरच संबंधित दुकानदारांचे व्यवसाय परवाने रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारने सोमवारपासून काही अटीवर पुणे शहरासह जिल्ह्याच्या काही भागात दुकाने व काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिल्याने, पूर्व हवेलीत सकाळपासून दुकानदारांनी दुकाने उघडण्यास सुरू केली होती. उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या मोठ्या गावात दुकाने सुरू झाल्याने अचानक नागरिक रस्त्यावर येत असल्याचे आढळून आले. मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी कंटेनमेंन्ट झोनमध्ये दुकाने उघडण्यास बंदी असल्याचे सांगत दुकानदारांना आपापली दुकाने बंद करण्यास भाग पाडले. 

याबाबत उरुळी कांचनचे उपसरपंच जितेंद्र बडकर म्हणाले, ""ग्रामीण भागातील व्यवसाय व दुकाने चालू करण्यासंदर्भात शासकीयस्तरावर दिवसातून अवेळ वेळा वेगवेगळे आदेश निघत आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे अनेक दुकानदारांनी सोमवारपासून आपापले व्यवसाय सुरू करण्यास सुरवात केली होती. मात्र, कंटेनमेंन्ट झोन असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने दुकाने उघडण्यास विरोध केला होता. मात्र, दुकानदार ऐकण्यास तयार नाहीत. यामुळे यापुढील काळात पोलिसांनीच कारवाई तीव्र करण्याची गरज आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT