पुणे

31 मार्च नव्हे, पुढील आदेशापर्यंत सर्व बंद - अजित पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे  - ""कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचा निर्णय 31 मार्चपर्यंत नव्हे, तर "पुढील आदेशापर्यंत' लागू राहणार आहे,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. आवश्‍यकता भासल्यास मुंबईतील लोकलसेवा बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच पुण्यातही असे निर्णय घ्यावे लागणार आहेत, असेही पवार यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा पवार यांनी घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे, हाच एकमेव पर्याय असून, नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पवार यांनी केले. 

पवार म्हणाले, ""मुंबई, नागपूर, पुणे व पिंपरी- चिंचवड या शहरांमध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने, कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या काळात व्यावसायिकांनी कामगार- कष्टकऱ्यांना पगारी सुटी द्यावी, असेही आवाहन पवार यांनी केले. 

अजित पवार म्हणाले... 
- सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या सूचना. 
- आवश्‍यक उपाययोजनांसाठी निधी कमी पडणार नाही. 
- निधीसाठी राज्य सरकार सक्षम आहे. 
- राज्य पातळीवर धोरणात्मक निर्णय. 
- स्थानिक परिस्थितीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्णयाचे अधिकार. 
- नागरिकांनी लग्न-अंत्यविधी अशा प्रसंगीही गर्दी टाळावी. 
- शक्‍य असल्यास लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलावा. 
- हे संकट गंभीर असल्याने निर्बंधांबाबत भावनेचा विषय करू नये. 

तीन महिन्यांचे रेशन देणार 
आपत्तीच्या या काळात दुकाने बंद आहेत आणि हातावर पोट असलेल्या गोरगरीब- कष्टकरीवर्गाचा रोजगारही बुडण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रेशनकार्डावर तीन महिन्यांचे धान्य देण्यात येणार आहे. त्यासोबत कांदे-बटाटे असे काही जिन्नस देण्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही पवार म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT