Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Pune News : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाच्या बढतीचा निर्णय गुलदस्त्यात

पुणे महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यास अतिरिक्त आयुक्तपदी बढती देण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने आयोजित केलेली विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक निर्णयाविना पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यास अतिरिक्त आयुक्तपदी बढती देण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने आयोजित केलेली विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक निर्णयाविना पार पडली. कोणत्या अधिकाऱ्याला पदोन्नती दिली जाईल याचा निर्णय तांत्रिक कारण देत गुलदस्त्यातच ठेवला आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कायम आहे.

नगर विकास’चे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी पुणे महापालिका व पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, उपसचिव, अवर सचिव यावेळी उपस्थित होते. महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या एकूण तीन जागा आहेत.

त्यापैकी एका जागेवर महापालिकेतील अधिकाऱ्याची नियुक्ती होऊ शकते. यामध्ये सध्या शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल आणि सह आयुक्त उल्का कळसकर हे तिन्ही अधिकारी पात्र आहेत.

तसा अहवाल नगरविकास विभागाला देण्यात आला आहेत. या तीन अधिकाऱ्यांपैकी प्रशांत वाघमारे यांना नावाला प्राधान्य देण्यात आले आहे, पण वाघमारे या पदासाठी फारसे इच्छुक नसल्याची चर्चा महापालिकेत आहे. यासंदर्भात त्यांच्याशी खातरजमा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकलेला नाही.

तर श्रीनिवास कंदूल हे पाच महिन्यांनी सेवानिवृत्त होणार आहेत. तर उल्का कळसकर यांची सेवा सुमारे सात वर्ष शिल्लक आहे. हे तिन्ही अधिकारी या पदासाठी पात्र असले तरी अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यासाठी तरतुदींमध्ये आणखी स्पष्टता असणे आवश्‍यक यावर डीपीसीमध्ये एकमत झाले आहे.

त्यामुळे बढतीबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. शासनातर्फे यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुढील तारीख लवकरच निश्‍चित केली जाईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT