पुणे

पाणी वापराच्या दंडाचा निर्णय राज्य सरकारच्या कोर्टात 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पाणी वापराचा करारनामा नसल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला सप्टेंबर ते डिसेंबर 2019 या कालावधीसाठी 14 कोटी 62 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. दंडाची रक्कम मान्य नसल्याने या प्रकरणी जलसंपदा विभागाशी विचार विनिमय सुरू असल्याचे महापालिकाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रश्‍नी संयुक्तिक तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागाची शासन स्तरावर बैठक घेणार असल्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

विधानसभेत पुणे महापालिकेस जलसंपदा विभागाने आकारलेल्या दंडाबाबत आमदारांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी ही माहिती दिली. मंजूर कोट्यापेक्षा पाण्याचा जादा वापर झालेला असल्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेस 15 कोटी 19 लाख एवढी अतिरिक्त रक्कम आकारली होती. तथापि, महापालिकेने तपासणी करून 13 कोटी 38 लाख एवढी रक्कम जलसंपदा विभागाकडे जमा केली आहे. महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये पाणी वापराचा करार झालेला असून, त्याची मुदत 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत होती. त्यास 31 ऑगस्ट 2019 पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. ही मुदत संपुष्टात आली असून, नवीन करारनामा करण्याबाबत महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने करारनामा करण्याबाबतची कार्यवाही पालिका आणि जलसंपदा विभाग यांच्या स्तरावर सुरू असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil on Hasan Mushrif : मानाच्या गणपती पूजनानंतर सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना केलं टार्गेट; "गोकुळच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला"

Sugarcane Agitation : माजी खासदार राजू शेट्टी माजी सहकार मंत्र्यांच्या भेटीला ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची केली विनंती

Water Shortage: अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाकडून जप्त

Maharashtra Ganesh Visarjan Live: अलका चौकात गणरायाच्या स्वागतासाठी साकारली भलीमोठी आकर्षक रांगोळी, गणपती मिरवणुकीच्या उत्साहात रंगले पुणे

New Blood Group: वैज्ञानिकांनी शोधला अतिदुर्मिळ 'JAMA' ब्लड ग्रुप! जाणून घ्या रुग्णांना काय होणार फायदा...

SCROLL FOR NEXT