lockdown 
पुणे

वाघोलीतील लॉकडाउनबाबत घेतलाय हा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा

वाघोली (पुणे) : वाघोली प्रतिबंधित क्षेत्र असल्याने 17 मेपर्यंत रुग्णालये, मेडिकल व डेअरी वगळता काहीही सुरू होणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाई करू नये व नागरिकांनी घर बाहेर पडू नये. असे वाघोली ग्रामपंचायत व लोणीकंद पोलिसांनी स्पष्ट केले. 

राज्य सरकारने रविवारी रात्री लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. वाघोली कोरोनामुक्त झाल्याने सरकारचे आदेश येताच व्यापाऱ्यांनी आजपासून दुकाने उघडली जाणार की काय, याबाबत चौकशी सुरू केली. कोणाकडूनच काही स्पष्टता नसल्याने गोंधळाचे वातावरण होते. शनिवारी ग्रामपंचायत सदस्य संदीप सातव, समीर भाडळे व काही सदस्यांनी उद्यापासून वाघोलीत काहीही सुरू होणार नाही, असे मेसेज सोशल मीडियावर टाकले होते. मात्र, तरीही व्यापाऱ्यांची चौकशी सुरू होती. सकाळी तर वाइन शॉपसमोर गर्दी झाली होती. सामाजिक अंतराचा पूर्ण फज्जा उडाला. गर्दीला हटविण्यासाठी पोलिसांना पावले उचलावी लागली. 
याबाबत हवेलीचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के म्हणाले, वाघोली प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे तेथे शिथिलता मिळणार नाही. वाइन शॉप बंद ठेवण्याबाबत हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. 

दरम्यान, लॉकडाउन पूर्वीप्रमाणेच 17 मेपर्यंत सुरू राहील. असे ग्रामपंचायतीने आज स्पष्ट केले. वाघोली कोरोनामुक्त झाले असले, तरी कोरोनाविरोधात अजून लढाई सुरूच आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. परराज्यात जाणाऱ्या नागरिकांसाठी वाघोलीतील भारतीय जैन संघटना शैक्षणिक संकुलात फिटनेस सर्टिफिकीटसाठी तपासणीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्ष गायकवाड यांनी दिली. 

वाघोली कोरोनामुक्त झाले असले, तरी धोका टळलेला नाही. लढाई अद्याप सुरूच आहे. वाघोली अद्याप प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे 17 मेपर्यंत रुग्णालये, मेडिकल व डेअरी वगळता काहीही सुरू होणार नाही. किराणा दुकानदारही केवळ घर पोहच सेवा देतील. अन्य दुकाने उघडल्यास गुन्हे दाखल केले जातील. 
- महादेव चव्हाण
ग्रामविकास अधिकारी, वाघोली 

वाघोलीत पूर्वी प्रमाणेच लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी होईल. नागरिकांनी बाहेर पडू नये. दारूची दुकानेही बंद राहणार आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- प्रताप मानकर
पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT