valase- kolhe 
पुणे

या निर्णयाचा शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : सातबारा उताऱ्यावर झाडांची नोंद नसली, तरी नुकसानग्रस्त झाडांचे पंचनामे करा. कोणताही शेतकरी वंचित ठेवू नका. तशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. असे आदेश कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनास दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे आंबेगाव तालुक्यातील तळेघर येथे नुकसान झालेल्या हिरडा पिकाची पाहणी दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. या वेळी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, माजी सभापती कैलासबुवा काळे, नंदकुमार सोनावले, प्रकाश घोलप, रूपाली जगदाळे, इंदुबाई लोहकरे, संजय शेळके, अक्षय काळे, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी टि. के. चौधरी आदी उपस्थित होते.

या वेळी वळसे पाटील व डॉ. अमोल कोल्हे यांनी आदिवासी भागातील तळेघर येथे भेट देऊन आदिवासी शेतक-यांशी चर्चा केली. राज्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशामध्ये हिरडा पिकाचे पंचनामे करण्याचा उल्लेख नव्हता. मात्र, हिरडा नुकसानीचे देखिल पंचनामे केले जावेत, असे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्या प्रमाणे सर्व शेतक-यांनी हिरडयाचे व झाडांचे पंचनामे करून घ्यावेत, असे वळसे पाटील यांनी सांगितले. 

पुणे येथे निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीसंदर्भात झालेल्या बैठकीत हिरडा पिकाच्या नुकसानीचा विषय वळसे पाटील यांनी घेतला आहे. या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी शेतक-यांना मदत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न हे सरकार करणार आहे, असे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Mangalwedha Drought: मंगळवेढ्यात पाणी-चाऱ्यासाठी काँग्रेसचे बेमुदत धरणे; काजू-बदामाच्या बैठकीवर चिरमुरे खाऊन आंदोलनाचा टोला

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

SCROLL FOR NEXT