पुणे

पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांत काही प्रमाणात घट

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील संघटित गुन्हेगारीसह अन्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध धंद्यावरील छापे व अन्य कारवायांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. मागील वर्षभरात आठ हजार ६७७ गुन्हे दाखल असून, गंभीर गुन्हे नऊ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. खुनाच्या घटना वगळता अन्य गुन्ह्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही ६७ टक्‍क्‍यांवर पोचल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.

शहरामध्ये २०१९ मध्ये घडलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती पोलिस आयुक्तालयामध्ये पत्रकार परिषदेत देण्यात  आली. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी त्याबाबत माहिती दिली. या वेळी पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.

शहरामध्ये २०१८ मध्ये नऊ हजार ५५२ इतके गंभीर गुन्हे दाखल होते, तर २०१९ मध्ये आठ हजार ६७७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ९०० गंभीर गुन्हे कमी झाले. त्यामुळे गंभीर गुन्हे नऊ टक्‍क्‍यांनी कमी झाले. 

मागील वर्षी शहराच्या वेगवेगळ्या भागांत जबर दुखापतीचे एक हजार २४५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी पोलिसांनी एक हजार २२५ गुन्हे उघडकीस आणले. मालमत्ताचोरीचे ३७६० गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १५०९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

शहरात २०१९ मध्ये १८ सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ची, तर १७९ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली. तर, साडेपाच हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करतानाच अवैध धंदे बंद करण्यासही प्राधान्य दिले. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता आले. मागील वर्षीच्या सर्व आकडेवारीचे योग्य संस्थेमार्फत विश्‍लेषण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येईल. - डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

मागील वर्षी शहरातील गुन्ह्यांमध्ये घट झाली. यंदा आम्ही त्यापेक्षा चांगले काम करून गुन्हे कमी करण्याचे प्रमाण आणखी कमी करण्यास प्राधान्य राहील.
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

महिला सुरक्षिततेचा प्रश्‍न कायम
शहरामध्ये २०१८ मध्ये बलात्काराच्या २३९ घटना घडल्या. त्यापैकी २३९ घटना उघडकीस आणण्यात आल्या होत्या. तर, विनयभंगाच्या ५१७ घटनांपैकी ५१० गुन्हे उघडकीस आले होते. तर, २०१९ मध्ये शहरात बलात्काराच्या २२४ घटना घडल्या. त्यापैकी २२२ घटना उघडकीस आल्या. विनयभंगाच्या ४१९ घटना घडल्या. त्यापैकी ४०९ घटना उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आली. २०१८ च्या तुलनेत बलात्कारच्या घटना अवघ्या ६ टक्‍क्‍यांनी, तर विनयभंगाच्या घटना १९ टक्‍क्‍यांनी कमी करता आल्या आहेत.

नागरिक म्हणतात..
देशात पोलिसांमुळेच लोकशाही टिकून आहे. पुण्यात पोलिस आयुक्तांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे. अवैध धंदे बंद केल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र, खंडणीमुळे नागरिकांचे प्राण जात आहेत. वाहतुकीच्या नावाखाली व कायद्याचा धाक दाखवून सर्वसामान्यांची लूटमार सुरू आहे. हा प्रकार असमर्थनीय आहे. पोलिसांनी त्यामध्ये सुधारणा घडवून आणावी.
- बाळासाहेब रुणवाल

नागरिकांना वाहतूक पोलिसांचा प्रचंड त्रास होतो. बसमधून चोरट्यांचा त्रास सुरू आहे. घरफोड्या, जबरी चोरीचे सत्रही कायम आहे. गाड्यांची जाळपोळ, तोडफोडचे प्रकार थांबत नाहीत. सुरू आहे. मग, गुन्हे कमी झाले कसे ? सात वर्षांच्या मुलीपासून ते नोकरदार महिलांपर्यंत अनेकांवर अत्याचार होत आहेत, खून होत असताना पोलिस स्वतःचीच पाट थोपटून घेत आहेत. 
- दत्ता जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT