Decomposition of Solid Organic Waste sakal
पुणे

Decomposition of Solid Organic Waste : जलपर्णीपासून पोषक खताची निर्मिती;सजीवांच्या पचनसंस्थेप्रमाणे घनजैविक कचऱ्याचे विघटन

पावसाळ्यात किंवा नदीला पाणी आले की पात्राच्या कडेला जलपर्णीचे ढीग लागतात. जलपर्णी अनेक दिवस पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी होते, तसेच नदीतील जीवसृष्टी आणि पाणीही धोक्यात येते.

सनील गाडेकर, सकाळ वृत्तसेवा

पुणे : पावसाळ्यात किंवा नदीला पाणी आले की पात्राच्या कडेला जलपर्णीचे ढीग लागतात. जलपर्णी अनेक दिवस पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी होते, तसेच नदीतील जीवसृष्टी आणि पाणीही धोक्यात येते. त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेले आई-वडील आणि लेकीचे संशोधन सफल झाले आहे. पिनाक ग्रुपचे संचालक तसेच अभियंता दिनेश चंद्रात्रे यांनी पत्नी डॉ. कीर्ती तसेच मुलगी मैथिली चंद्रात्रे-शेट्टी यांच्या साथीत हे यंत्र बनविले. त्याद्वारे ३६ तासांत जलपर्णींपासून उत्तम दर्जाचे खत तयार होते. हे यंत्र पूर्ण भारतीय बनावटीचे आहे.

एव्ही सिरीज असे यंत्राचे नाव असून एनव्होनेस्ट कंपनीने याची यंत्राची निर्मिती केली आहे. निसर्गातून घेतलेल्या बायोमासचे योग्य पद्धतीने व निश्चित कालावधीत विघटन झाल्यास सर्व मूलद्रव्ये निसर्गाला परत केली जातील आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल हा यामागील उद्देश आहे. याबाबत मैथिली यांनी सांगितले की, घर, हॉटेल, बाग आणि शेतीमधील घन जैविक कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी मी व आई २००९ पासून कार्यरत आहोत. सजीवांमधील पचनसंस्थेप्रमाणे संपूर्ण विघटन करणारी प्रक्रिया कृत्रिम पद्धतीने बनविण्याचे आमचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानुसार संशोधनातून आम्ही यंत्राची निर्मिती करू शकलो.

अनेक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास

कीर्ती या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झाल्या असून त्यांनी पॅथॉलॉजीमध्ये पदविका घेतली आहे. सजीवांची पचनसंस्था कशी काम करते व त्या आधारावर कृत्रिम पचनसंस्था निर्माण करण्यासाठी कोणते जिवाणू आवश्यक आहे हे शोधून काढण्यासाठी त्यांनी शाळा-महाविद्यालयांतील अनेक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी अनएरोबिक म्हणजेच ऑक्सिजनशिवाय विघटन करणारे एनव्होनेस्ट सूक्ष्मजीव शोधून काढले. या संशोधनाला भारतासह इतरही काही देशांचे पेटंट मिळाले आहे.

यंत्र असे काम करते

यंत्रात आधी जलपर्णी कापली जाऊन बारीक चुरा तयार होतो. त्यानंतर त्यातून पाणी वेगळे केले जाते. त्यानंतर चुरा एका चेंबरमध्ये टाकून त्यात एनव्होनेस्ट सूक्ष्मजीव मिसळून ते मिश्रण अनएरोबिक पद्धतीने २४ तास ढवळून काढले जाते. त्यानंतर प्रक्रिया झालेले त्यातून बाहेर येते. ते गरम हवेच्या झोताद्वारे वाळविले जाते. अशाप्रकारे केवळ ३६ तासांत खत बनते.

यंत्राची वैशिष्ट्ये-फायदे

  • खताची निर्मिती होण्याची प्रक्रिया कोणतेही प्रदूषण न होता केवळ ३६ तासांत पूर्ण

  • घन जैविक कचऱ्याचे वजन ९० टक्के कमी होते आणि अंदाजे १० टक्के खताची निर्मिती होते

  • दोन ते तीन कामगारांच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने कमी वेळेत चांगल्या दर्जाच्या खताची निर्मिती

  • हरित तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वातावरणास

  • अनुकूल

  • एकावेळी ५०० किलो जलपर्णीवर प्रक्रिया होऊन सुमारे ३५ किलो खताची निर्मिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT