पुणे

Coronavirus : कर्मचारी घटल्याने डॉक्टरांच्या अडचणीत भर

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील बहुतेक दवाखाने आणि लहान मोठ्या रूग्णालयांतील सफाई, निमवैद्यकीय प्रशासकीय कर्मचारी वर्ग घटल्याने डॉक्टरांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

शहरात अँलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक अशा विविध वैद्यकीय शाखांचे १ हजारांपेक्षा जास्त दवाखाने असून ४५० पेक्षा अधिक लहान मोठी रूग्णालये आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक दवाखाने आणि रूग्णालयांतील कर्मचारी संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे, डॉक्टरांना निरनिराळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

राज्यात आणि त्या पाठोपाठ देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक कर्मचारी सहकुटुंब गावी गेले आहेत. तर काही दवाखाने-रूग्णालयांना खानावळी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने त्यांच्या कर्मचार्यांना नाईलाजाने सुट्ट्या द्याव्या लागल्या आहेत.

याबाबत फॅमिली फिजिशियन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दवाखान्यांमध्ये १ ते २ कर्मचारी, मदतनीस असतात. तर रूग्णालयात तेथील खाटांच्या संख्येनुसार कर्मचारी संख्या कमी-अधिक असते. बहुतेक मोठ्या रुग्णालयांनी त्यांच्या दैनंदिन कामावर जास्त परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली आहे. मात्र, दवाखाने व लहान रूग्णालयांवर त्याचा निश्चितच परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT