pune sakal
पुणे

डी.एड, बी.एडच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी देऊ शकणार ‘टीईटी’

१० ऑक्टोबरला होणार ‘टिईटी’ परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुम्ही शिक्षणशास्त्रच्या पदविका (डी.एड) किंवा पदवी (बी.एड) अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात आहात का! अहो, मग तुम्हालाही यंदा शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच ‘टीईटी’ परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आता शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड) आणि पदवीच्या (बी.एड) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचे अर्ज भरण्याची संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली असून, आता विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. परीक्षा परिषदेमार्फत १० ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा आयोजित केली आहे. (Pune News)

राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटीसाठी अर्जाची प्रक्रिया तीन ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र डी.एड आणि बी.एड झालेल्या उमेदवारांनाच टीईटी परीक्षा देण्याची मुभा परीक्षा परिषदेने यापूर्वी दिली होती. त्या विरोधात उमेदवारांनी आवाज उठविल्यानंतर आता शिक्षण विभागाने शिक्षणशास्त्रात पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही टीईटीचे अर्ज भरण्याची परवानगी देण्याचे आदेश परिक्षा परिषदेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनी टीईटीचा अर्ज भरताना व्यावसायिक अर्हतेची माहिती भरताना त्यांना लागू असलेल्या पदविका, पदवी या संदर्भात मागील परीक्षेची (पदविका प्रथम वर्ष, पदवी तृतीय सत्र इत्यादी) माहिती भरावी लागणार आहे. प्रमाणपत्र क्रमांकएवजी संबंधितांनी त्यांच्या परीक्षेचा बैठक क्रमांक नोंद करायचा आहे. प्रवेश अर्ज आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत पाच सप्टेंबर  आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे परिक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT