Pune : आंबील ओढ्यावरील पहिल्या पुलाचे लोकार्पण 
पुणे

Pune : आंबील ओढ्यावरील पहिल्या पुलाचे लोकार्पण

नवीन गावांच्या महापालिकेतील समावेशाने राष्ट्रवादीचा सत्तेचा मार्ग सुकर; माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा विश्वास

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : आंबील ओढ्याच्या महापुरात धोकादायक झालेल्या खोपडेनगर येथे महापालिका मुख्य विभागाच्या वतीने नवीन बांधण्यात आलेल्या पहिल्या पुलाचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बोलताना महापालिकेत नव्याने समाविष्ठ गावांमुळे पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळवणे सुकर झाला असल्याचे मत माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

शिंदे म्हणाले, राज्याच्या कानाकोपऱ्यातुन नोकरी व रोजगारासाठी नागरिक या भागात वास्तव्यास आहेत. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कटिबद्ध आहेत.गुजर-निंबाळकरवाडी मूलभूत सुविधा विकास कामे व पाझर तलाव विकासनाचा प्रस्ताव द्यावा.जलसंपदा विभागामार्फत सर्वतोपरी मदत करू. तसेच, प्रास्ताविकात गुजर-निंबाळकरवाडीचे सरपंच व्यंकोजी खोपडे यांनी जनतेतून सरपंच निवड झाल्यानंतर साडे तीन वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच खोपडेनगर पुलासाठी मदत करणारे मनपा नगरसेवक व प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी नगरसेवक प्रकाश कदम म्हणाले की, नव्याने समाविष्ठ गावांसाठी भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महादेवनगर येथे ८० लक्ष लिटर क्षमतेची टाकी उभारली.तसेच विकास आराखड्यात मुलकी वन क्षेत्रात नव्याने पाण्याची टाकी, वन विभागाच्या लगत जॉगिंग ट्रॅक व अन्य विकास प्रकल्पांसाठी पाठपुरावा सुरू आहे.

गणेशोत्सवात गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन गोरक्षस्मृती फाउंडेशनच्या वतीने सरपंच व्यंकोजी खोपडे यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक प्रकाश कदम, नगरसेविका राणी भोसले, रायबा भोसले, संजय पिसाळ, गणेश काळे, अजय काळभोर, महेश धुत व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News: निलेश घायवळ टोळीतील फरार सदस्य जयेश वाघला अटक; कोथरूड गोळीबार प्रकरणात होता सहभाग

Ranji Trophy 2025: शतकवीर ध्रुवने सावरला विदर्भाचा डाव; ओडिशाविरुद्ध ३ बाद ६ वरून पहिल्या दिवसाअखेर ५ बाद २३४ धावा

Latest Marathi Breaking News Live: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली, देवभूमीचे लोक पारंपारिक ढोल-ताशांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यास उत्सुक

आर्यनच्या दिग्दर्शनाखाली शाहरुखचं शूटिंग? बाप-लेकाची जुगलबंदी रंगणार, लेकाच्या चित्रपटात वडिलांची मुख्य भूमिका!

Kolhapur Sugarcane : ऊसदर आंदोलनापासून १० वर्षे लांब राहिलेले माजी आमदार उल्हास पाटलांची अचानक एन्ट्री, 'आंदोलन अंकुश'ला पाठींबा; Video Viral

SCROLL FOR NEXT