पुणे

पुणे : 21 दिवसांपू्र्वी झाले होते लग्न पण...

डी.के.वळसे पाटील

मंचर : पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना संघटित करून त्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र लढणारा योद्धा दीपक लक्ष्मण ढोबळे (वय ३०, रा.पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव) यांचे निधन झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 21 दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. हृदयविकारामुळे गुरुवारी रात्री ८ वाजता निधन झाले.

अपंगहित विकास व पुनर्वसन संघाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. सहा वर्षांपूर्वी अनाथांसाठी काम करणारे विलास पंदारे व (कै). राजेंद्र  वाबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यास सुरवात केली. त्यांनी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी तालुका पंचायत समिती, पुणे जिल्हा परिषद, जिल्हा अधिकारी कार्यालय, ससून हॉस्पिटल व अपंग कल्याण आयुक्तालय पुणे येथे त्यांनी केलेले आंदोलने गाजली. या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी त्यांनी अनेकदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेतली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दिवाळीमध्ये ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही भेटले होते. खऱ्या अर्थाने ते दिव्यांगांचे आधार ठरले होते. निस्वार्थीपणे काम करणारा  कार्यकर्ता असा त्यांचा नावलौकिक निर्माण झाला होता. जिल्ह्यातील अनेक पंचायत समितीकडून कायदा 2016 चा वापर प्रभावीपणे होत नव्हता. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  ते सातत्याने प्रयत्न करत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा उद्देश ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीने बांधलेले व्यवसाय बाजार गाळे दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्याची तरतूद, ससून हॉस्पिटलऐवजी प्रत्येक तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालयात किवा ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र, वेळेत रोजगार भत्ता, लॉकडाऊनच्या काळात मोफत रेशनिंग आदी प्रश्नांचा त्यांनी पाठपुरावा केला. गावोगावी मेळावे घेऊन एस.टी व रेल्वे प्रवासाठी सवलतीचे पास त्यांनी काढून दिले. दिव्यांगांना मोफत जयपूर वाटपासाठी त्यांचा पुढाकार होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यापूर्वीच त्यांचे आईवडील व बहिणीचे छत्र हरपले होते. एकटेच ते राहत होते. त्यांचा विवाह पारगाव (ता.आंबेगाव) येथे मुक्ताई मंदिरात (ता.२५ मे) साध्या पद्धतीने प्रांजल यांच्याबरोबर झाला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होते. त्यांनी मंचर येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करून उपचार घेतली होते. पण गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले.

मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दिव्यांगांचा आधार गेला, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेत व्यक्त केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT