पाबळ, ता. १ : पाबळ पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार दीपक खैरे यांनी या गणात केलेल्या विकासकामांच्या बळावर प्रचार जोमात सुरू केला आहे. हीच कामे घेऊन ते मतदारांशी थेट संपर्क साधत आहेत. त्यांच्या कामाबाबत माहिती असल्याने या भेटीगाठींदरम्यान सर्वसामान्य मतदारांकडून त्यांचे स्वागत होत आहे.
उमेदवारी मिळाल्यानंतर दीपक खैरे यांनी संपूर्ण गणातील प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संयत प्रचारावर त्यांनी भर दिला आहे. या गणातील प्रत्येक गावात, तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन ते आपल्या कामाची माहिती असलेली पत्रके वाटून विकासकामांची, नावीन्यपूर्ण योजनांची, कल्पकतेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती मतदारांना देत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात परिसरातील ग्रामस्थ, महिला भगिनी सहभागी झाल्या आहेत.
दीपक खैरे म्हणाले, ‘‘या भागातील ग्रामस्थांना एकेकाळी पाण्यासाठी मैलौनमैल पायपीट करावी लागायची. त्यावेळी मांदळवाडी (हिवरे) येथील पाचशे एकर जमीनीला पदरमोड करून पाणी उपलब्ध करून दिले. त्यातून या भागात कृषीसमृद्धी साधली व शेतीला कायमस्वरूपी पाण्याची सोय झाली. त्यामुळे लोकांनी त्यांना प्रेमाने ‘जलदूत’ उपाधी दिली. तसेच हिवरे- धामारी कृषी सिंचन प्रकल्प फेज २ लवकरच पूर्ण होणार आहे. पाबळ परिसरातील गावांची व वाड्यावस्त्यांची दुष्काळी ओळख पुसण्याची खुणगाठ मनाशी बांधली असून, यापुढील काळात हा भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.