SGW26B09434
दीपक साळुंखे-पाटील
---
भविष्यात कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेणार
दीपकआबा साळुंखे-पाटील; सांगोल्यात कार्यकर्त्यांची आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ९ : नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत आपण कमी पडलो. मात्र पराभवाचे शल्य बाजूला ठेवून झालेल्या चुका टाळत आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले. कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार लवकरच योग्य निर्णय घेऊ, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
रविवारी (ता. ८) सांगोला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस ज्येष्ठ नेते तानाजी पाटील, शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, विजय येलपले, चंद्रकांत चौगुले, तुकाराम जाधव, विजय पवार, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, सुनील पाटील, ॲड. यशराजे साळुंखे-पाटील, डॉ. पियुष साळुंखे-पाटील, समीर पाटील यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी साळुंखे-पाटील म्हणाले, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नेहमीच आमच्यावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे विश्वास ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार कमी पडले असले तरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आजही साळुंखे-पाटील परिवारावर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे.
बैठकीत मनोज उकळे, लहू कांबळे, अमर लोखंडे, विजय शिंदे, संतोष पाटील, विलास घुले, संभाजी हरिहर, अजित देवकते, सखूबाई वाघमारे, नारायण माळी, अजिंक्य शिंदे, दीपक कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. आगामी राजकारण लक्षात घेऊन साळुंखे-पाटील यांनी योग्य आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.