deepali kolekar 
पुणे

पीएसआय परीक्षेत साताऱ्यातील दीपाली कोळेकर मुलींमध्ये पहिली

सकाळवृत्तसेवा

पुणे - दोन वर्षांपासून फौजदार (पोलिस उपनिरीक्षक) भरती परीक्षेचा रखडलेला निकाल अखेर आज राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला. करमाळा येथील वैभव नवले हा या परीक्षेत राज्यात पहिला, तर दीपाली कोळेकर ही मुलींमध्ये पहिली आली आहे. 

आयोगाने 2018 मध्ये फौजदारपदांसाठी मुख्य परीक्षा घेतली होती. मात्र, दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नाही. त्यानंतरही एक परीक्षा घेण्यात आल्याने आधीच्या परीक्षा दिलेल्या तरुणांमध्ये अस्वस्थता होती. फौजदार परीक्षेसाठी आयोगाने दोन वर्षांपूर्वी 387 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार वैभव नवले हा पहिला, ज्ञानदेव काळे दुसरा, तर भाऊसाहेब दहिफळे हा राज्यात तिसरा आला आहे. या यादीत दीपाली कोळेकर हिचा चौथा क्रमांक आहे. मात्र, ती राज्यात मुलींमध्ये पहिली आली आहे. 

वैभव नवले म्हणाला, ""फौजदार परीक्षेचा हा माझा दुसरा प्रयत्न होता. जुन्या प्रश्‍नपत्रिकांचा अभ्यास, त्या सोडविणे आणि आधीच्या परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांचे मार्गदर्शन घेतले. त्याचा फायदा मला झाला आहे.'' 

दीपाली कोळेकर ही सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील कुसरोंड गावातील आहे. तिचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत. 

परीक्षेसह सर्व प्रक्रिया होऊन दोन वर्षे झाली. पण आता निकाल लागला. ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाली पाहिजे. आम्हाला आता नाशिक येथे पोलिस प्रशिक्षणासाठी जावे लागेल. परंतु, 2017 ला परीक्षा झालेल्या बॅचचे प्रशिक्षण तेथे सुरू आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठीही आम्हाला काही महिने वाट पाहावी लागणार आहे. 
- दीपाली कोळेकर, मुलींमध्ये पहिली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT