Deepshikha Singh student presents research on breast cancer Savitribai Phule Pune University 
पुणे

जैव तंत्रज्ञान विभागातील दीपशिखा सिंग विद्यार्थिनीचे संशोधनात योगदान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: स्तनाच्या कर्करोगाबाबतचा शोधनिबंध सादर

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान विभागातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या दीपशिखा सिंग या विद्यार्थिनीने व जैव तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. राजेश गच्चे यांनी नुकताच एक शोधनिबंध सादर केला असून त्यांतर्गत स्तनाच्या कर्करोगाबाबत तिने महत्त्वपूर्ण निरीक्षणे सादर केली आहेत.

जागतिक नियतकालिक (जर्नल) 'ड्रग रेजिस्टंट अपडेट ' यामध्ये हा शोधनिबंध सादर केला आहे. २२.८४ इम्पॅक्ट फॅक्टर असणाऱ्या इतक्या उत्तम नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित करणारी दीपशिखा सिंग ही विद्यापीठातील पहिली विद्यार्थ्यांनी ठरली असल्याचे डॉ.राजेश गच्चे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. गच्चे म्हणाले, जागतिक कर्करोगांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग हा क्रमांक एक वर होता, मात्र अलीकडच्या काळात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले असून स्तनाचा कर्करोग एक क्रमांकावर आल्याचे पाहायला मिळत आहे. स्तनाच्या कर्करोगावर उपलब्ध असलेल्या औषोधोपचार पद्धतीला अनेक कारणांमुळे सध्या प्रतिबंध केला जात आहे. त्यापैकी 'लॉग नॉन कोडींग आर एन ए ' या एका प्रमुख कारणामुळे या उपचार पद्धती आज स्तनाच्या कर्करोगावर निष्प्रभ असल्याचे प्रस्तुत संशोधनात दिसून आले आहे. या शोधनिबंधात या विषयावरील शास्त्रीय तथ्ये मांडली आहेत.

डॉ.राजेश गच्चे यांच्या प्रयोगशाळेत या समस्येवर मूलभूत संशोधन सुरू आहे. यासाठी 'एसईआरबी डीएसटी' दिल्ली या संस्थेने भरीव अर्थसहाय्य दिले आहे. डॉ. गच्चे यांना नुकतेच रॉयल सोसायटी ऑफ मेडीसिन, लंडन यांनी मानद सदस्यत्व बहाल केले आहे. त्यानिमित्त डॉ. गच्चे यांच्याबरोबरच दीपशिखा हीचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदींनी कौतुक करत अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT