Deer
Deer 
पुणे

पुणे : पुण्याजवळचं हे अभयारण्य तुम्हाला माहीतच नाहीये! इथे चिंकारा आहे!

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘आपल्यापासून जेमतेम ८० किलोमीटवरील मयूरेश्‍वर अभयारण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का,’ या एका प्रश्‍नाचे ‘हो’ असे उत्तर देणारे २२६ पैकी फक्त ५६ जण होते. १७० लोकांना याची माहिती नाही. कारण, या अभयारण्यातील प्राणी आतापर्यंत कोणत्याच माहितीपटाच्या कॅमेऱ्यात आले नाहीत. सर्वांत दुर्मीळ असलेल्या चिंकाऱ्यापासूनही माहितीपट दूरच राहिले आहेत. 

जंगल पर्यटनासाठी पुणेकर जवळ असलेल्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात जातात. कोणी ताडोबा गाठतात, जेजुरी, मोरगाव, बारामती ही गावे माहिती आहेत; पण या मयूरेश्‍वर अभयारण्याची माहिती नाही. 

मयूरेश्‍वर अभयारण्यावर आधारित शास्त्रीय माहितीपट वन खात्याने तर नाहीच, पण इतर कोणीही प्रसिद्ध केलेला नाही. 

‘नेचर वॉक’चे अनुज खरे म्हणाले, ‘‘येथे चिंकारा, कोल्हा, तरस, लांडगा, असे प्राणी तसेच, गवताळ प्रदेशातील दुर्मीळ पक्षी आहेत; पण यावर अद्यापपर्यंत कोणताही माहितीपट साकारला नाही. त्यामुळे येथील वन्यप्राणी, पक्षी आणि वनस्पतींची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोचलेली नाही.’’ मुख्य वनअधिकारी रवी वानखेडे म्हणाले, ‘‘या गवताळ प्रदेशात दुर्मीळ वन्यजीव आहेत; पण त्यांच्यावर माहितीपट करावा, असा एकही प्रस्ताव गेल्या काही वर्षांमध्ये आमच्याकडे आलेला नाही.’’

का होत नाही माहितीपट?
माहितीपट चित्रित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रावीण्य आवश्‍यक असते. कॅमेऱ्याचा दर्जा उत्तम असावा लागतो. तसेच, त्याच्यासोबत प्राण्यांची माहिती असणारा जाणकार माणूस आवश्‍यक असतो. प्राण्याची शास्त्रीय माहिती गरजेची असते. ती योग्य क्रमाने मांडण्यासाठी अचूक ‘एडिटिंग’ करावे लागते. इतके सगळे करूनही अपेक्षित उत्पन्न मिळेलच याची खात्री देता येत नाही. कारण, याला ठराविकच प्रेक्षकवर्ग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT