Savitribai Phule Pune University Sakal
पुणे

रोजगारक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘डिग्री प्लस’ची मात्रा

विद्यापीठाचा महत्वाकांक्षी उपक्रम; ४०० पेक्षा अधिक अभ्यासक्रम

सम्राट कदम

पुणे : पारंपारिक अभ्यासक्रमांना शिकत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्यांचे वाढावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘डिग्री प्लस’ नावा अभिनव उपक्रम घेऊन येत आहे. सर्व विद्याशाखांना सामावून घेणारे आणि उद्योगांना अपेक्षीत ४०० पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचा हा खजिना नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे.

काय ?

पदवीचे शिक्षण घेत असतानाच उद्योग, सेवा, माहितीतंत्रज्ञान आदी क्षेत्रांना अपेक्षीत कौशल्य विद्यार्थ्यांना यावीत म्हणून उद्योगांच्याच सहभागाने सुरू केलेला उपक्रम. ऑनलाइन, ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित हे अभ्यासक्रम विद्यार्थ्याला मर्जीप्रमाणे निवडता येतील.

कसे ?

एका संकेतस्थळाच्या माध्यमातून अभ्यासक्रम विद्यार्थ्याला शिकता येईल. ज्यामध्ये व्हिडिओ, ऑनलाइन कार्यशाळा, उपक्रम यांच्या माध्यमातून शिकविले जाईल. आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिकवणी, कार्यशाळा किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष अनुभव यांची रचना करण्यात आली आहे.

कोण ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने खासगी कंपनीच्या सहकार्याने ४०० पेक्षा जास्त अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे. उपक्रमाची व्याप्ती महाराष्ट्रभर असेल परंतु, प्रथम प्राधान्य विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना असेल.

केव्हा ?

संपूर्ण वर्षभर पदवीला शिकत असताना विद्यार्थ्याला हे अभ्यासक्रम शिकता येतील. यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून, नोव्हेंबर महिन्यात प्रवेश सुरू होतील.

कोठे?

विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या संकेतस्थळावर लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमच्या आधारे ऑनलाइन आणि ऑफलाईन अभ्यासक्रम घेता येईल.

वैशिष्ट्ये

- विद्यापीठासह आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रमाणपत्र मिळणार

- कला, वाणिज्य आणि विज्ञानशाखेतील

सर्व अभ्यासक्रमांचा समावेश

- उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ प्रत्यक्ष शिकवणार

- प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव

- खिशाला परवडेल या दरात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम

- प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम

अभ्यासक्रमांबाबत...

सहभागी उद्योग : अमेझॉन, कोर्सेरा, सिंपली लर्निंग, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस

संख्या : ४०० पेक्षा अधिक

कालावधी : ३ ते ११ महिने

शुल्क : ४०० ते ४००० रुपये

प्रवेश क्षमता : बंधन नाही

"विद्यापीठात येणारे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतीलच असे नाही. मात्र, विद्वान नक्की असतात. जगाच्या गरजा आणि ज्ञान वेगाने बदलत आहे. नियमित अभ्यासक्रमात ही कौशल्ये प्राप्त होत नाही. अशा वेळी बदलत्या जगाच्या कसोटीवर उतरण्यासाठी अतिशय माफक किमतीत हे अभ्यासक्रम डिग्री प्लसच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे."- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT