देहू, ता. ५ : देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा प्रियंका मोरे यांनी पदाचा राजीनामा नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्याकडे दिला. त्यामुळे नवीन उपाध्यक्षपदासाठी इच्छुक सदस्यांच्या हालचालींना वेग आला. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी राजीनामा दिला. नवीन उपाध्यक्षपदासाठी येत्या दहा तारखेपर्यंत कार्यक्रम जाहीर होईल. सदस्यांची मुदत डिसेंबरअखेर संपणार आहे. त्यामुळे पदासाठी अनेक सदस्य इच्छुक आहेत. आमदार सुरेश शेळके उर्वरित काळासाठी कोणत्या पुरुष उमेदवाराला संधी देतात याकडे देहूकरांचे लक्ष आहे. दरम्यान, स्वीकृत सदस्य अमोल काळोखे आणि योगेश मोरे यांनीही गटनेते योगेश परंडवाल यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. पुढील आदेशानंतर कार्यवाही होईल, असे परंडवाल यांनी सांगितले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.