Rahul Gandhi esakal
पुणे

Pune News : राहुल गांधी यांच्याविरोधातील दाखल दाव्यात दिरंगाई; स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातवाचा आरोप

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल असलेल्या दाव्यात पोलिस तपासात दिरंगार्इ करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल असलेल्या दाव्यात पोलिस तपासात दिरंगाई करत आहेत, असा आरोप सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केला आहे.

सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात सखोल तपास करून पोलिसांना २३ फेब्रुवारीपूर्वी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी विश्रामबाग पोलिसांना दिला होता. मात्र मुदतीत अहवाल सादर न केल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी कामात दिरंगार्इ केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अहवाल सादर करण्यासाठी पोलिसांनी मुदतवाढ मागितली आहे. त्यावर न्यालयाचा आदेश अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी गुरुवारी (ता. ४) पत्रकार परिषदेत दिली. ॲड. शिवराज जोशी, राहुल भानगोंडे आणि डॉ. सचिन बोधनी यावेळी उपस्थित होते.

या गुन्ह्याच्या तपासात तपास यंत्रणेकडून दिरंगाई होत आहे. त्यामागे काय कारण आहे? तपासाबाबत पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? असेल तर कोणाकडून असे प्रश्नही त्यांनी या प्रसंगी उपस्थित केले. या प्रकरणात पारदर्शकता असावी, असा मुद्दा अधोरेखित करत तातडीने न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राहुल गांधी यांचे भाषण यु ट्युबवर प्रसिद्ध झालेले आहे. त्या भाषणांची लिंक आणि आयपी एड्रेस यु ट्युबकडे मेलद्वारे मागण्यात आलेला आहे. तसेच हा व्हिडिओ बनावट आहे की खरा याची तपासणी करण्यात येत आहे. ज्या चॅनेलवर हे भाषण आहे तो चॅनल कोणाचा आहे, याचा देखील तपास करण्यात येत आहे. यु ट्युबकडून अद्याप माहिती न आल्याने वेळेत अहवाल सादर करता आलेला नाही. त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आले आहे.

- दीपाली भूजबळ, पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT