पुणे

हेड अत्याचाराला कोण जबाबदार?

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.१ ः दिल्लीमध्ये धावत्या बसमध्ये युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. बसमध्ये युवतीवर अत्याचार झाला पण पोलिसांना या घटनेची माहिती झालेली नाही. या घटनेची जबाबदारी कोणाची? असा सवाल गांधी यांनी समाजमाध्यमांवरून उपस्थित केला आहे.
‘स्लिपर सीट्स’च्या चारही बाजूला पडदे लावलेले असूनही संबंधित बस नोएडा, ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वे, दिल्लीतील रिंग रोड या मार्गावरून धावली. पण या बसला कोणीही रोखू शकलेले नाही. दिल्लीतील महिला असुरक्षित झाल्या आहेत. स्लीपर बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेची माहिती दिल्ली आणि नोएडा पोलिसांना झालेली नाही. ‘निर्भया’ प्रकरण आणि त्यानंतर महिला अत्याचाराच्या असंख्य घटना घडूनही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी स्लीपर बसची तपासणी आणि नियमांचे पालन का केले जात नाही, असा सवाल गांधी यांनी केला आहे. बसमध्ये लावण्यात आलेले पडदे हे केवळ ती घटना लपवण्यासाठीचे माध्यम नव्हते तर सरकारच्या प्रशासकीय अपयशावर पडलेले पडदे देखील दर्शविते, अशी टीका गांधी यांनी केली.

जबाबदारी निश्चित करावी
या प्रकरणाचे उत्तरदायित्व निश्चित केले जावी, अशी मागणी गांधी यांनी केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या संबंधित बलात्काराच्या घटनेची माहिती ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांना देण्यात आली होती. आरोपी बस वाहक आणि चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित युवती मूळची उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी असून ग्रेटर नोएडामधील परी चौक भागामध्ये ती बसमध्ये बसली होती. आरोपींनी तिला ४७ किलोमीटर लांबवर काश्मिरी गेट परिसरामध्ये नेऊन सोडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Diet Tips: ट्रेकिंग करताना काजू-बदाम खाताय? हाय अल्टीट्यूडवर ड्रायफ्रूट्स खाणे धोकादायक! वाचा तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

Retirement Planning: 60 नाही, 43 व्या वर्षीच रिटायरमेंट! 85 लाखांचा फंड अन् 39 हजार भाडे, कपलचा प्लॅन नेमका काय?

का मोडला 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा संसार? म्हणाली, 'एखाद्याला निघून जायचं असतं तेव्हा...'

मंगळ-बुधाचा विशेष योग! करिअर अन् पैशांच्या बाबतीत चमकणार ‘या’ राशींचे नशीब?

SCROLL FOR NEXT