पुणे

हेड ‘कॉक्रोच’ पुन्हा मैदानात

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.९  ः मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून  राजधानी दिल्लीत उद्यापासून (ता.१०) केंद्रातील मोदी सरकार आणि ‘जेन-झीं’ची कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) यांच्यात जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारूनही  ‘सीजेपी’ने जंतरमंतरवरच आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
केंद्र सरकारने सुमारे तीस हजारांहून अधिक जवान तैनात केले असून ५७ मेट्रो स्थानकांमधून गाड्यांचे आगमन-प्रस्थान बंद राहील. चार किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट बंद करून हे आंदोलनच निष्प्रभ करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी शनिवारपासून जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने केलेला अर्ज दिल्ली पोलिसांनी फेटाळला असून या भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  अतिशय कमी वेळेमध्ये दिलेली सूचना, आधीच्या आंदोलनादरम्यान झालेले नियमांचे उल्लंघन, सार्वजनिक सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापन यासारख्या कारणांचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

कोट
जंतरमंतर हे शासनाने आंदोलनासाठीच निश्चित केलेले ठिकाण आहे, त्यामुळे तिथे निदर्शने करण्यासाठी पोलिसांच्या स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नाही. तुम्हाला देशातील तरुणांची एवढी भीती वाटत असेल तर संपूर्ण देशच बंद करून टाका.
- अभिजित दीपके, संस्थापक, ‘सीजेपी’

आंदोलनाच्या आघाडीवर
-‘जंतरमंतर’ला लष्करी छावणीचे रूप
- मैदानाच्या चारी बाजूंनी बॅरिकेड
- मुख्य महामार्गांवर कठोर बंदोबस्त
- मध्य दिल्लीत लॉकडाउनसारखी स्थिती
- मध्यवर्ती भागात कॅनॉट प्लेस बंद राहणार
- चार किमी परिसरामध्ये इंटरनेटवरही बंदी
- केंद्रीय सुरक्षा दलाच्या २२१ कंपन्या तैनात


हॉटेल बंद राहणार?
दिल्लीतील हॉटेल आणि अतिथिगृहांना नव्या लोकांना दाखल न करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीतील दारुची  दुकाने रविवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवी दिल्ली आणि हजरत निझामुद्दीन रेल्वे स्थानकांवरील रेल्वेगाड्यांचे आगमन-प्रस्थान  शनिवारी पहाटे ४ वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत रद्द करण्यात आले आहे.

‘माशा मारण्यासाठी हातोडा नको’
मेट्रो स्थानके बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त करण्यात आली असून ‘माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नये’, अशी टिपणी आज न्यायालयाकडून करण्यात आली. ‘सीजेपी’च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो स्टेशनचे प्रवेशद्वार बंद करण्याच्या निर्णयावरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे  गुरुग्राम, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील इतर भागांतून ये-जा करणारे विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांसह  हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागेल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आंदोलनामुळे रेल्वे गाड्या रद्द करणे आणि मेट्रो स्थानके बंद ठेवण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ विधिज्ञ  कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: विंडीजची ढापाढापी.. संजू सॅमसनची 'विराट' विक्रमाशी बरोबरी, कोहलीने २०१९ मध्ये केलेला असा पराक्रम...

Gangapur News : लग्नानंतर काठी नवऱ्याला मारू नकोस, नाना पाटेकरांच्या त्या मिश्किल प्रतिक्रियेची साक्षी शिरसाटला आठवण

Maharashtra Live News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे आंदोलन; १० खासदार राष्ट्रपतींच्या भेटीला

NCP Expulsion : बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; विद्यमान अध्यक्षांवर तडकाफडकी कारवाई

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

SCROLL FOR NEXT