पुणे

दिल्ली विद्यापीठावर ‘अभाविप’चा झेंडा

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली,ता.१९ ः कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) जुलै महिन्यात केलेले तरुणांचे आंदोलन आणि पाच मजली सत्य निकेतन वसतिगृह कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये आज भाजप- रा.स्व.संघ पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बाजी मारली. अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशा चारपैकी तीन केंद्रीय पदांसाठी झालेल्या लढती परिषदेने जिंकल्या आहेत. उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. या निवडणुकीत जोरदार लढत देऊनही काँग्रेसप्रणीत ‘एनएसयूआय’ चारपैकी एकही जागा जिंकू न शकल्याने चारीमुंड्या चीत झाली. ‘आम आदमी पक्ष’ प्रणीत ‘असाप’ आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना ‘आयसा-एसएफआय’ यांचाही धुव्वा उडाला.
अध्यक्षपदासाठी  झालेल्या निवडणुकीत ‘अभाविप’च्या यश डबासने ‘एनएसयूआय’च्या विजय शंकर मीणाचा २ हजार ५३ मतांनी पराभव केला. यश डबासला  २४ हजार ५७६ मते मिळाली तर विजय मीणाला २२ हजार ५२३ मते मिळाली आहेत.  दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत ‘एनएएसयूआय’ला सतरा वर्षांमध्ये प्रथमच एकही जागा जिंकता आलेली नाही.  उपाध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत ‘एनएसयूआय’च्या  बंडखोर अपक्ष उमेदवार दीपांशू शौकीनने  ३० हजार ६१५ मते मिळवून ‘अभाविप’च्या इशू मौर्याचा पराभव केला. ‘एनएसयूआय’च्या  वीर चतरथला  ४ हजार ३१३ मते मिळाली. 

अशीही बाजी
- सचिवपदाच्या  लढतीत ‘अभाविप’च्या रिया छावडीने २१ हजार ६५० मते मिळवून ‘एनएसयूआय’च्या नम्रता चौधरीचा पराभव केला. नम्रता चौधरीला  १४ हजार ८६९ मते मिळाली.  सहसचिवपदासाठी  झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत ‘अभाविप’च्या लक्ष्यराज सिंहने १६ हजार ६४१ मते मिळवून समाजवादी छात्र सभेचा उमेदवार विशेष यादवचा निसटत्या अंतराने पराभव केला.

प्रथमच ‘ईव्हीएम’चा वापर
- विशेष यादवला  १५ हजार ७७८ तर ‘एनएसयूआय’च्या गोपाल चौधरीला १५ हजार १०६ मते मिळाली.  दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची निवडणूक यंदा प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या माध्यमातून पार पडली. शुक्रवारी झालेल्या शांततापूर्ण मतदानादरम्यान दिल्ली विद्यापीठातील ५२ महाविद्यालयांच्या १ लाख ५१ हजार पात्र मतदारांपैकी ४०.४६ टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले.

प्रतिक्रिया
ही निवडणूक खूप महत्त्वाची आणि प्रतिकात्मक होती. तरुणांचा आवाज दाखवून देणारा हा जनमताचा  कौल ठरला.
- किरेन रिजिजू, केंद्रीयमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

SCROLL FOR NEXT